Prakash Ambedkar: आंबेडकर जरांगेंवर पुन्हा बरसले! म्हणाले, संधी होती तेव्हा पाणी फिरलं आणि आता लढ्याची भाषा करताय
Sarkarnama August 27, 2025 03:45 PM

Pune News : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं म्हणून पुन्हा एकदा सरकारविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. या मागणीसाठी त्यांनी बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन मुंबईतील आझाद मैदानात होणार असून, त्यांनी राज्यातील सर्व मराठा बांधवांना मुंबईत एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

या पार्श्वभूमीवर ओबीसी समुदयाकडून त्यांना प्रचंड विरोध होत आहेच, त्यात वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी देखील जरांगेंच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. या विरोधाची त्यांनी पुनरावृत्ती केली आहे.

Ashok Chavan News : लातूरची रेल्वे तुम्ही नांदेडला येऊ दिली नाही, पण आम्ही तसे करणार नाही! अशोक चव्हाणांचा टोला..

कालच आंबेडकरांनी सोशल मीडियावर पोस्ट करत गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना जरांगे पाठिंबा देत असल्याचा आरोप केला होता. गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका, अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमधून केली होती. त्यानंतर आज पुण्यात पत्रकार संघामध्ये झालेल्या वार्तालापात प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा जरांगेंवर टीका केली. ते म्हणाले, जरांगे हे रयतेतील मराठ्यांसाठी लढत आहेत असं बोललं जात आहे. मात्र, राजकारण हे निजामी मराठ्यांसाठी चाललेलं आहे, हे उघड झालं आहे.

Jagdeep Dhankhar News : जगदीप धनखड यांच्याविषयी मोठी अपडेट; पत्नी सुदेश यांचे महिनाभरात 3 जयपूर दौरे...

यातून बाहेर पडून खरंतर फक्त रयतेतील गरीब मराठ्यांसाठीच लढा उभारला पाहिजे. यासाठी जरांगेंकडं संधी आली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतःचं राजकीय अस्तित्व आणि वर्चस्व निर्माण करून निर्णय करून घेण्याची पूर्ण संधी त्यांच्याकडं होती. माणसंही त्यांच्या मागे उभे राहिली होती. ती संधी त्यांनी वाया घालवली. लोकांच्या उत्साहाला जोर देण्यापेक्षा त्यावर जरांगे यांनी पाणी फेरलं आणि आता पुन्हा ते लढ्याची भाषा करत आहेत, अशा शब्दांत आंबेडकरांनी त्यांच्यावर टीका केली.

Nashik Municipality : मनपात परसेवेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमागे भाजपचा मोठा मंत्री? माजी नगरसेवकांमध्येही नाराजीचे फटाके

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी लढा उभारत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मंडल यात्रेच्या निमित्ताने ओबीसींसाठी यात्रा काढत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने ढोल वाजवण्याचा काम सुरू असून या ट्रॅपमध्ये ओबीसींनी अडकू नये असं आवाहनही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.