PM Kisan Maandhan Yojana : 60 वर्षांनंतर आर्थिक आधार, वर्षाला मिळणार 36 हजार रुपये; योजना ठरेल शेतकऱ्यांसाठी वरदान!
Sarkarnama August 27, 2025 03:45 PM
PM Kisan Maandhan Yojana भारत कृषी प्रधान देश!

आपल्या देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे. कोट्यवधी शेतकऱ्यांची उपजीविका शेतीतूनच चालते.

PM Kisan Maandhan Yojana शेतकऱ्यांची समस्या

वयाच्या 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांची शारीरिक ताकद कमी होते आणि उत्पन्नाचे साधन जवळजवळ संपते.

PM Kisan Maandhan Yojana शेतकऱ्यांसाठी खास योजना

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली आहे.

PM Kisan Maandhan Yojana या योजनेत काय मिळेल?

वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3000 पेन्शन. म्हणजेच दरवर्षी 36,000 ची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.

PM Kisan Maandhan Yojana कोण अर्ज करू शकतो?

या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षे असावे तसेच या वयोगटातील सर्व शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत.

PM Kisan Maandhan Yojana गुंतवणूक किती?

18 वर्षांनी अर्ज केल्यास दरमहा 55 रुपये भरावे लागणार तर 40 वर्षांनी अर्ज केल्यास दरमहा 200 रुपये भरावे लागणार आणि ही रक्कम 60 वर्षांपर्यंत भरावी लागते.

PM Kisan Maandhan Yojana वयाच्या 60 नंतरचा फायदा

गुंतवणुकी केल्यावर निवृत्तीनंतर शेतकऱ्याला दरमहा खात्रीशीर 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे.

PM Kisan Maandhan Yojana अन्य योजनेसह फायदा

शेतकरी पीएम किसान सन्मान निधीतून मिळणारा पैसा या योजनेत गुंतवून भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकतात.

Next : महाराष्ट्राला नवी भेट! आज धावणार आणखी एक ‘वंदे भारत एक्सप्रेस’; असा असेल संपूर्ण रूट!  येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.