जगात असंही एक गाव आहे, ज्या गावातील महिलांनी आपल्याच पतींची हत्या केली, या गावात अशा एक दोन नाही तर तब्बल शेकडो घटना घडल्या आहेत. जेव्हा हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आला, तेव्हा जगभरात खळबळ उडाली होती. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार या गावात 1911 ते 1929 या काळात शेकडो महिलांनी आपल्या पतीची हत्या केली. हे गाव हंगेरीची राजधानी बुडापेस्ट पासून 130 किलोमीटर अंतरावर आहे. नाग्यरेव असं या गावाचं नाव आहे.
सुरुवातील 50 महिलांनी आपल्या पतीला विष देऊन मारल्याची बातमी समोर आली होती, त्यानंतर अशाच प्रकारे पुरुषांच्या मृत्यूची अनेक प्रकरणं समोर आली. या महिलांनी विष देवून आपल्या पतीची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. आर्सेनिक नावाचं विषारी द्रव्य देऊन या महिलांनी आपल्या पतीचा जीव घेतला होता. हे प्रकरण उशिरा समोर आलं, तोपर्यंत अनेक महिलांनी आपल्या पतीची हत्या केली होती. काही लोक या घटनेला महिलांच्या हाताने झालेलं आतापर्यंतचं सर्वात मोठं सामूहिक हत्याकांड मानतात.
या सर्व हत्याकांडामध्ये एक कॉमन नाव होतं, ते म्हणजे जोजसाना फाजकास या महिलेचं, ही महिला या गावातील दाई होती, पूर्वीच्या काळी ग्रामीण भागांमध्ये वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध नव्हती, त्या गावात कोणताही वैद्य नव्हता, त्यामुळे गावातील सर्व महिला पुरुष याच महिलेकडून औषध घ्यायच्या. गावामध्ये ही महिला खूप प्रसिद्ध होती.
या महिलेवर असा आरोप लावण्यात आला होता की, गावातील महिला या महिलेला आपल्या आयुष्यातील सर्व घटना सांगत असत, तिच्यासमोर आपलं मन मोकळ करत असतं. ज्या महिलावर तिच्या पतीकडून प्रचंड अत्याचार व्हायचा, त्याला मारण्यासाठी ही दायी त्या महिलेकडे विष द्यायाची, आणि तेच विष देऊन या महिलांनी आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. दरम्यान या घटनेबाबत सर्वात प्रथम अमेरिकेतली एका वृत्तपत्रानं बातमी छापली होती, त्यानंतर जगभरात खळबळ उडाली.
महिलांनी आपल्या पतीला का मारले?
ज्या महिलांनी आपल्या पतीला मारले त्यांचा पती त्यांच्यावर खूप अत्याचार करत होता, त्यांना मारहाण करत होता, तसेच ज्यांची, ज्यांची हत्या करण्यात आली त्यांच्यावर इतरही अनेक आरोप होते.