Virar Shocking : विरारमध्ये ४ मजली इमारत कोसळली, ३ जणांचा मृत्यू, पहिल्या वाढदिवसाला चिमुकलीवर काळाचा घाला
Saam TV August 28, 2025 02:45 AM

विरार मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. विरारच्या नारंगी फाटा परिसरात असलेली रामू कंम्पाऊडच्या स्वामी समर्थ नगर येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची ४ मजली इमारतींचा मागील चौथ्या मजल्याचा एक भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास रमाबाई अपार्टमेंट या ४ मजली इमारतीचा मागील चौथ्या मजल्याचा एक भाग कोसळला. ही इमारत दहा वर्ष जुनी असून महापालिकेने ॲाडीट करण्याची नोटीस दिली होती. मात्र या दुर्गटनेत अद्याप तीन जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. तर वसईचे आमदार स्नेहा दुबे-पंडीत यांच्या म्हणण्यानुसार इमारतीत २० ते २५ जण अद्याप अडकल्याची शक्यता वर्तवली आहे.

Vasai - Virar : कर्मचाऱ्यांना पगार नाही, वसई-विरार मनपाची बससेवा ठप्प; ऐन गणेशोत्सवात नागरिकांना मनस्ताप

सध्या घटनास्थळी एन.डी.आर.एफ. टिम आणि वसई विरार शहर महापालिकेची अग्निशमन दलाची टिम रेस्क्यूच काम करत आहे. आतापर्यंत 9 जणांना रेस्क्यू करुन, त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर मलब्यात अडकलेल्या नागरिकांची माहीती मिळावी यासाठी डॅागस्कॅाट आणण्यात आला आहे. त्याद्वारे ही सर्च ॲापरेशन सुरु आहे.

Virar News: रामनवमीच्या रॅलीला गालबोट, अंडी फेकल्याचा आरोप; विरारमध्ये तणावाची स्थिती

दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या आजूबाजूला दाटीवाटीने चाळी-इमारती आहेत. त्यामुळे रेस्क्यूसाठी यंत्र सामग्री पोहचत नाही. मोठ-मोठे मलबे काढण्यासाठी जेसीबी ही पोहचू शकत नाही. इमारतीचा राडारोडा बाहेर काढावा लागणार आहे.

Virar Crime : सोसायटीतील सोलर पॅनल बसविण्यावरून वाद; रेल्वे कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल

चिमुकलीच्या वाढदिवशी काळाचा घाला

या इमारतीत राहणाऱ्या जोयल कुटुंबातील एका चिमुरडीचा पहिला वाढदिवस होता. त्यानिमित्त त्यांच्या घरी पाहुणेमंडळी आले होते. या दुर्घटनेत ज्या चिमुरडीचा वाढदिवस होता तिचा देखील यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तिच्या आईचा ही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर वडील ओमकार जोयल हे अद्याप सापडले नाहीत. याच इमारतीतील चौथ्या मजल्यावर राहणारे सचिन निवळकर (वय 44), बायको सुपरीला निवळकर (वय 40), मुलगा अर्णव निवळकर (वय 14) हे सुद्धा अद्याप सापडलेले नसल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अपघातानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.