शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले
Marathi August 28, 2025 08:25 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सहकुटुंब भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लालबागच्या राजाचेही दर्शन घेतले.

२७ जुलै रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येण्याचे निमंत्रणही दिले होते. उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे आज सकाळी राज ठाकरे यांच्या दादर येथील निवासस्थानी पोहोचले. गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर उभय कुटुंबांमध्ये मनमोकळा संवाद रंगला. राज ठाकरे यांच्या निवासस्थानाहून उद्धव ठाकरे हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेले. त्यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.