Buldhana : राजुर घाटात एसटीने १७ मेढ्यांना चिरडले; मेंढपाळांचे दीड ते २ लाखाचे नुकसान
Saam TV August 28, 2025 11:45 PM

बुलढाणा : मोताळा तालुक्यातील बुलढाणा ते मलकापूर रोडवरील राजूर घाट रस्त्यात भरधाव वेगाने आलेल्या महामंडळाच्या बसने मेंढ्याना चिरडले. या भीषण अपघातात अकरा मेढ्यांचा मृत्यू झाला असून सहा मेढ्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये मेंढपाळांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर बस चालक न थांबता फरार झाला आहे. 

बुलढाणाजिल्ह्यातील वारुळी येथील मेंढपाळ शांताराम संजू बिचकुले यांचे यात नुकसान झाले आहे. दरम्यान शांताराम बिचकुले हे रोजच्या प्रमाणे सकाळी बुलढाणा ते मोताळा रोडवर खडकी शिवारात मेंढ्यांच्या कळप चारण्यासाठी निघाले होते. यावेळी ते राजूर घाट रस्त्यावरून मेंढ्या घेऊन जात असताना बुलढाण्यावरून मलकापूरकडे भरधाव वेगाने आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीने मेंढ्याना उडविले. 

जागेचा वाद टोकाला! मायलेकीसह तिघींवर प्राणघातक हल्ला, लोखंडी रॉडनं काळंनिळं होईपर्यंत मारलं

११ मेंढ्यांचा मृत्यू 

घाटात रस्ता ओलाडत असलेल्या मेंढ्याच्या कळप असताना बसचालकाने बसचा वेग कमी न करता धडक देत मेंढ्यांना चिरडले. या अपघातात १८ ते २० मेंढ्या चिरडल्या गेल्या. त्यामध्ये ११ मेंढ्यांचा जागीच चिरडून मृत्यु झाला असुन ६ मेंढ्या जखमी झाल्या आहेत. तर १ लहान मेंढीचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. या अपघातामुळे मेंढपाळ शांताराम बिचकुले यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Dharur News : पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात टाकली गाडी; गाडीसह व्यापारी गेला वाहून, रिक्षा चालकही वाहिला

बस चालक झाला फरार 

मेंढ्याचा कळप रस्त्याने जात असताना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने जोरदार धडक दिल्यानंतर मेंढ्या चिरडल्या गेल्या. हा घटनेनंतर देखील बसचालक हा घटनास्थळी न थांबता जोरदार वेगाने बस घेऊन पळून गेल्याचा प्रकार घडला. तर रस्त्यावर मेंढ्यांचा खच पडला होता. शिवाय रस्त्याने येणारे वाहन धारक देखील थांबले असल्याने मार्गावर वाहतूक खोळंबली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.