‘… तर परिणाम भोगण्यास तयार रहा’, ‘या’ देशाने पाकिस्तानला दिली धमकी, नेमकं प्रकरण काय?
GH News August 29, 2025 01:14 AM

भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते. तसेच दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. त्यानंतर आता आणखी एका शेजारी देशासोबत पाकिस्तानचे संबंध बिघडले आहेत. हा देश म्हणजे अफगाणिस्तान. सीमेवरून या दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. गुरुवारी अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे राजदूत ओबैदुर रहमान निजामानी यांना बोलावून याबाबत तीव्र आक्षेप नोंदवला आणि पाकिस्तानला थेड धमकी दिली आहे.

अफगाणिस्तानमध्ये स्फोट

समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने एक केलेली हवाई कारवाई होती. यामध्ये पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हवाई क्षेत्राचे उघड उल्लंघन करत नांगरहार आणि खोस्तमध्ये बॉम्बस्फोट घडवला होता. यात 3 नागरिकांचा मृत्यू झाला होता, तसेच 7 जण जखमी झाले होते. यानंतर अफगाणिस्तानने यावर संताप व्यक्त करत म्हटले की, हा हल्ला केवळ एक सीमा उल्लंघन नसून सामान्य लोकांचा जीव घेणारे एक बेजबाबदार कृत्य आहे.

अफगाणिस्तानचा पाकिस्तानला इशारा

या घटनेनंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. तालिबानने म्हटले की’अफगाणिस्तानचे हवाई क्षेत्र ही आमची लाल रेषा आहे. यापुढे असा निष्काळजीपणा समोर आला तर त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील. कारण पाकिस्तानी सैन्याने जे केले आहे ते एक चिथावणी देणारे कृत्य आहे.

2021 पासून दोन्ही देशांमधील संबंध बिघडले

अफगाणिस्तानमध्ये 2021 मध्ये तालिबानने सत्ता स्थापन केली. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध बिघडलेले आहेत. पाकिस्तानचा असा आरोप आहे की तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चे दहशतवादी अफगाणिस्तानच्या भूमीवरून पाक सैनिकांवर आणि सामान्य लोकांवर हल्ले करत आहेत. मात्र अफगाणिस्तान असं म्हणत आहे की पाकिस्तान स्वत:च्या अपयशासाठी आम्हाला जबाबदार धरत आहे.

पाकिस्तान संकटात

गेल्या काही काळापासून पाकिस्तान संकटात आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी सैन्यावरही हल्ले झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तान दहशतवाद्यांना नियंत्रित करण्यासाठी अफगाणिस्तानवर सतत दबाव आणत आहे. मात्र आता पाकिस्तानने स्पष्ट शब्दात पाकिस्तानचे आरोप नाकारले आहेत, तसेच सीमेत हस्तक्षेप केल्यास कारवाईचा इशाराही पाकिस्तानला दिला आहे. त्यामुळे आता आगामी काळात पाकिस्तानकडून चूक झाल्यास अफगाणिस्तानकडून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.