Mahavikas Aghadi leaders Political Kolhapur : ‘गोकुळ’च्या राजकारणात महायुती म्हणून एकत्र येत असताना मिठाचा खडा मी टाकणार नाही, पण त्यांनीही महाविकास आघाडीच्या नेत्यांना किती जवळ करायचे हे ठरवावे लागेल, त्यांनाही हा नियम लागू आहे आणि माझ्या शंकांचे निरसनही करावे’, अशी प्रतििक्रया संचालिका शौमिका महाडिक यांनी दिली.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकारांशी बोलताना महाडिक यांनी महायुती म्हणून संयम राखण्याचे आवाहन करताना त्यात मिठाचा खडा पडणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतििक्रया देताना शौमिका महाडिक म्हणाल्या, ‘मी दरवर्षीप्रमाणे सर्वसाधारण सभेपूर्वी पत्रकार परिषद घेणार आहे, त्यात माझे काही अनुत्तरित प्रश्न आहेत, जे यापूर्वीच मी त्यांना विचारले आहेत. या अनुत्तरित प्रश्नांच्या उत्तरांची वाट बघेन, नाही तर माझी भूमिका मी स्पष्ट करेन. महायुतीत खडा पडेल असे मी तरी काही वागणार नाही; पण हा नियम त्यांनाही तेवढाच लागू पडतो.’
स्टेज मुन्ना महाडिकांचं, हजेरी मुश्रीफांची, गोकुळमध्ये गेम होणार बंटी पाटलांचा? Satej Patil, Mahadik | Sakal Newsमहाडिक म्हणाल्या, ‘महायुती म्हणता तर मी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देणे बंधनकारक आहे. संचालक म्हणून जर प्रश्न विचारत असेल तर त्याची उत्तरे द्याल ही माझी अपेक्षा आहे. महायुतीत खडा पडेल असे तेही वागणार नाहीत आणि माझ्या सर्व शंकाचे निरसन करतील. ‘गोकुळ’मध्ये महायुती असेल तर सर्वसाधारण सभेला महायुतीचेच नेते येणार. त्या नेत्यांना ‘गोकुळ’च्या अध्यक्षांसह सर्वांनी किंवा प्रशासनाने सन्मानाने बसवायला पाहिजे.’