जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांपैकी एक असलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे लक्झरीयस लाईफ स्टाईलमुळेही चर्चेत असतात. त्यांचे निवासस्थान हे पश्चिम अमेरिकेतील सर्वात महागड्या परिसरात आहे. त्यांचे निवासस्थान एका महालासारखे आहे. त्यांच्या घराची नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत हे आपण पाहूयात…
बिल गेट्स यांच्या निवासस्थानाचे नाव Xanadu 2.0 आहे. हे जगातील सर्वात हायटेक आणि आलिशान प्रॉपर्टी मानले जाते. हे घर ६६,००० चौरस फूटावर पसरलेले आहे. आणि याची किंमत सुमारे १२६ कोटी डॉलर ( सुमारे १०,००० कोटी रुपये ) म्हटली जाते. हा आकडा थोडा मागे पुढे असू शकतो. परंतू हे घर काही सामान्य घर नाही ते सुपर लक्झरी पॅलेस आहे.
या महालात सात मोठे बेडरुम आणि २४ बाथरुम आहेत. या शानदार घरात जर तुम्ही गेलात तर आतील सुविधा हैराण करणाऱ्या आहेत. एका हाय टेक किचनमध्ये कोणतीही डीश तयार करण्याच्या एडव्हान्स मशीन्स लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला काही खायचे आणि प्यायचे असेल तर जास्त विचार करायचा गरज नाही.
या घरात एक लायब्ररी आहे.ज्यात हजारो पुस्तके आहेत. बिलगेट्स येथे आपला वेळ घालवतात. तसेच मोशन सेंसर आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीने संपूर्ण घर नियंत्रित केले जाते. लाईट, एसी, गार्डन सर्वकाही एका क्लिकवर बंद होते आणि सुरु होते. म्हणजेच संपूर्ण घर हायटेक सुविधेने सुसज्ज आहे.
हॉलीवूडसारखे थिएटर रुम येथे आरामात जीवनाचा आनंद कोणताही व्यक्ती घेऊ शकतो.
इनडोर स्विमिंग पूल आणि आऊटडोर गार्डन या दोन्ही जागी आराम आणि एंटरटेन्मेंटसाठी आहेत.
हेल्थ एण्ड फिटनेस झोन जिम, योगा स्टूडियो आणि स्पाची देखील सोय आहे.
सस्टेनेबल टेक्नोलॉजी म्हणजे संपूर्ण घर सोलर पॉवर आणि एनर्जी-एफिशिएंट आहे.
बिल गेट्सचे घर केवळ आलीशान नाही तर त्यांच्या लाईफस्टाईला देखील दर्शवते. या फॅमिली टाईम, हुमॅनिटेरियन मिटींग्स आणि रिसर्च प्रोजेक्टसाठी जागा आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनची मिटींग आणि रिसर्च प्रोजेक्टसाठी देखील जागा आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या मिटींग या घरात नेहमीच होतात. घरात इतकी स्पेस आणि टेक्नॉलॉजी असूनही बिल गेट्स आणि त्यांचे कुटुंबांची लाईफ खाजगी आणि रिलॅक्स असते. त्याचे घर एक प्रकारे फ्युचरिस्टीक घर प्लस लक्झरी लाईफस्टाईल या दोन्हींचे मिश्रण आहे. जर तुम्ही विचार करत असाल की जगातील श्रीमंत लोक कसे रहात असतील तर Xanadu 2.0 हे त्याचे उदाहरण आहे.