मराठ्यांचं भगवं वादळ मराठा आरक्षणासाठी आज मुंबईत दाखल झालं आहे. मनोज जरांगे पाटील आज आझाद मैदानाद आंदोलन करणार आहे. मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढत आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील काम करत आहेत. अनेक वेळा त्यांनी आंदोलनेदेखील केली. दरम्यान, मनोज जरांगे पाटील कोण आहेत ते जाणून घ्या.
मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीडच्या जिल्ह्यातील. गेवराई तालुक्यातील माथोरी हे त्यांचे गाव आहे. माथोरी गावातील ते एक अल्पभूधारक शेतकरी आहेत.
मनोज जरांगे पाटील यांची सासरवाडी शहागडची आहे. गेल्या १२-१५ वर्षांपासून ते सासुरवाडीत म्हणजे शहागडमध्ये वास्तव्यास आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी २०१५ पासून अनेक आंदोलने केली. ते गेल्या १०-१२ वर्षांपासून आरक्षणासाठी लढत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी शिवा संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक मराठ्यांना एकत्र केले आणि हक्कासाठी आंदोलन केली.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठी आरक्षणासाठी आर्थिक रसद मिळावी, म्हणून स्वतः च्या मालकीची जमिनदेखील विकली आहे.
मनोज जरांगे पाटील यांना एकूण ३ भावंडे आहेत. ते सर्वात लहान आहेत. त्यांनी १२वीत असताना शिक्षण सोडले आणि आरक्षणाच्या चळवळीत सहभागी झाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीचं सौमित्रा पाटील असं आहे. त्यांना चार मुले आहेत. तीन मुली आणि १ मुलगा असं त्यांचं कुटुंब आहे.