मुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात आंदोलन असल्याने फ्री वे रोडचा वापर टाळा, कृपया त्यानुसार नियोजन करा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी मुंबईकरांना केले आहे.
मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते शुक्रवारी मुंबईत आंदोलन करण्यासाठी आले आहेत.आंदोलकांना फ्रीवे वरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होत आहेत. फ्रीवेवर वाहनांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे आझाद मैदानात आंदोलन असल्याने फ्री वे रोडचा वापर टाळा, कृपया त्यानुसार नियोजन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सायन पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यतामराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना पूर्व मुक्त मार्ग वरून जाण्याची मुभा देण्यात आली आहे. पूर्व मुक्त मार्गावरील वाहतूक सायन पनवेल मार्गावरून वळविण्यात आली आहे, वाहतूक पोलीस खाजगी वाहने पूर्व मुक्त मार्गावरून सायन पनवेल मार्गावर वळवीत आहेत. नेहमीच्या तुलनेत सकाळी गर्दीच्या वेळी वाहने सायन पनवेल मार्गावर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते.