शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ 'डॅडी' याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात गवळी 18 वर्षांपासून तुरुंगात आहे. अरुण गवळी यांनी जामिनासाठी अनेक वेळा न्यायालयात धाव घेतली होती, परंतु त्यांना जामीन मिळू शकला नाही. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ते तुरुंगातून बाहेर येऊ शकतात.सविस्तर वाचा..
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी गुरुवारी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात 1500 हून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जरांगे (43) यांनी यापूर्वी 29ऑगस्टपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली होती..सविस्तर वाचा..