Asian Hockey Trophy 2025: विश्वकरंडकाच्या तिकिटासाठी आजपासून झुंज; आशियाई हॉकी करंडक, यजमान भारताचा सलामीचा सामना चीनशी
esakal August 30, 2025 02:45 AM

राजगीर (बिहार) : भारतामध्ये उद्यापासून (ता. २९) आशियाई हॉकी करंडकाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या पुढल्या वर्षी (२०२६) नेदरलँड्स व बेल्जियम येथे होत असलेल्या विश्वकरंडकासाठी पात्र ठरता येणार आहे. तीन वेळचा आशियाई करंडक विजेता भारतीय पुरुष हॉकी संघ विश्वकरंडकात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसणार आहे. भारताचा सलामीचा सामना शुक्रवारी चीनशी होणार आहे.

भारतीय हॉकी संघाचा अ गटात समावेश असून, यामध्ये यजमान संघासह चीन, जपान व कझाकस्तान या देशांचाही समावेश आहे. ब गटामध्ये दक्षिण कोरिया, मलेशिया, बांगलादेश व चीन तैपई या चार देशांमध्ये खडाजंगी रंगणार आहे. कझाकस्तानचा संघ तब्बल तीन दशकांनंतर आशियाई करंडकात सहभागी होणार आहे.

Virat Kohli-Rohit Sharma: विराट-रोहितचं नाव वनडे क्रमवारीतून का झालेलं गायब? ICC कडून मिळालं उत्तर

भारतीय हॉकी संघाला मागील काही सामन्यांमध्ये ठसा उमटवता आलेला नाही. भारतीय हॉकी संघाची एफआयएच प्रो लीगमध्ये सातव्या स्थानावर घसरण झाली. भारतीय हॉकी संघाविरुद्ध प्रो लीग हॉकीमध्ये प्रतिस्पर्धी संघांनी २६ गोल केले. आठ सामन्यांमध्ये भारताविरुद्ध २६ गोल करण्यात आले. पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट हरमनप्रीत याच्या अनुपस्थितीत भारतीय खेळाडूंना गोल करण्यातही अपयश आले. अमित रोहिदास, जुगराज सिंग व संजय यांना पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात अपयश आले. आशियाई करंडकात भारताचा बलाढ्य संघ मैदानात उतरणार आहे. तरीही कमकुवत बाबींवर या संघाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

चीनविरुद्ध पारडे जड पण...

भारतीय हॉकी संघाचा सलामीचा सामना चीनशी होणार आहे. चीनचा संघ जागतिक क्रमवारीत २३व्या स्थानावर आहे. चीनला फक्त एकदाच ऑलिंपिकमध्ये प्रवेश करता आला आहे. मायदेशातील २००८ मधील ऑलिंपिकमध्ये त्यांची ११व्या स्थानावर घसरण झाली होती.

विश्वकरंडकातही ते एकदाच सहभागी झाले. २०१८ मध्ये त्यांना दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. याच कारणामुळे चीनविरुद्धच्या लढतीत भारतीय हॉकी संघाचे पारडे जड आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तरीही निष्काळजीने खेळ करून चालणार नाही.

स्पर्धेची गटवारी

  • अ - चीन, भारत, जपान, कझाकस्तान

  • ब - बांगलादेश, चीन तैपई, मलेशिया, दक्षिण कोरिया

भारतीय संघाच्या लढती

  • २९ ऑगस्ट - चीन

  • ३१ ऑगस्ट - जपान

  • १ सप्टेंबर - कझाकस्तान

सुपर फोर लढती

  • ३ सप्टेंबर

  • ४ सप्टेंबर

  • ६ सप्टेंबर

World Badminton Championship 2025 : सिंधू, प्रणोयची विजयी सलामी; भारताच्या फुलराणीने ३९ मिनिटांत प्रतिस्पर्धी खेळाडूला नमवलं...

तिसऱ्या क्रमांकाची

  • व अंतिम लढत

  • ७ सप्टेंबर

  • (दोन्ही लढती एकाच दिवशी

  • होणार आहेत)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.