झिंबाब्वेचा रंगतदार झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरुद्ध अवघ्या 7 धावांनी पराभव झाला. श्रीलंकेने झिंबाव्वेसमोर 299 धावांचं आव्हान दिलं होतं. झिंबाब्वेने या सामन्यात शेवटपर्यंत लढत दिली. झिंबाब्वेला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 10 धावांची गरज होती. मात्र दिलशान मधुशंका याने 50 व्या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलमध्ये सलग 3 विकेट्स घेत हॅटट्रिक पूर्ण केली. दिलशानने शेवटच्या ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावा दिल्या आणि श्रीलंकेला विजयी केलं. श्रीलंकेने झिंबाब्वेचा तोंडातील विजयाचा घास हिसकावला. मात्र या सामन्यात झिंबाब्वेचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज ब्रँडन टेलर याने इतिहास घडवला. ब्रँडनने काही वर्षांच्या बंदीच्या कारवाईनंतर संघात कमबॅक केलं. ब्रँडनने या कमबॅकसह मोठी कामगिरी केली.