UAE vs AFG : यूएई विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने, कोण मिळवणार पहिला विजय?
GH News September 01, 2025 03:16 AM

आशिया कप 2025 स्पर्धेआधी यजमान यूएई, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या संघात टी 20 ट्राय सीरिज खेळवण्यात येत आहे. या मालिकेत एकूण 7 सामने होणार आहेत. प्रत्येक संघ या मालिकेत 4-4 सामने खेळणार आहे. आतापर्यंत या मालिकेत 2 सामने झाले आहेत. या पहिल्या दोन्ही सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तान आणि त्यानंतर यूएईला पराभूत केलं. पाकिस्तानने यासह सलग 2 विजय मिळवले. त्यानंतर आत या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 2 पराभूत संघ आमनेसामने असणार आहेत. हा सामना जिंकून सलग दुसरा पराभव टाळण्याचं आव्हान दोन्ही संघांसमोर असणार आहे. या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

यूएई विरुद्ध अफगाणिस्तान सामना केव्हा?

यूएई विरुद्ध अफगाणिस्तान सामना सोमवारी 1 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.

यूएई विरुद्ध अफगाणिस्तान सामना कुठे?

यूएई विरुद्ध अफगाणिस्तान सामना शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

यूएई विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

यूएई विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 8 वाजता टॉस होईल.

यूएई विरुद्ध अफगाणिस्तान सामना टीव्हीवर कोणत्या चॅनेलवर पाहायला मिळेल?

यूएई विरुद्ध अफगाणिस्तान सामना भारतात दाखवण्यात येणार नाही.

यूएई विरुद्ध अफगाणिस्तान सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

यूएई विरुद्ध अफगाणिस्तान सामना मोबाईलवर फॅनकोड एपद्वारे पाहता येईल.

टी 20 ट्राय सीरिजला 29 ऑगस्टपासून सुरुवात झाली. मालिकेतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर 39 धावांनी मात केली. पाकिस्तानने त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 30 ऑगस्टला यजमान यूएईला 31 धावांनी पराभूत करत सलग दुसरा विजय मिळवला. पाकिस्तानने अशाप्रकारे सलग 2 विजय मिळवले.

त्यामुळे आता 1 सप्टेंबरला होणारा सामना जिंकण्याचं आव्हान अफगाणिस्तान आणि यूएईसमोर असणार आहे. राशीद खान अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर मुहम्मद वसीम याच्याकडे यूएईच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे.  यूएईच्या तुलनेत अफगाणिस्तान टीम अनुभवी आहे. तसेच अफगाणिस्तान टीममध्ये अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे यूएईच्या तुलनेत अफगाणिस्तानचं पारडं जड आहे. मात्र त्यानंतरही  या दोघांपैकी कोणता संघ विजयी होतो आणि कुणाला सलग दुसऱ्यांदा पराभावाचा सामना करावा लागतो? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.