दुलीप ट्रॉफी स्पर्धेची धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडू खेळत आहेत. अनेक खेळाडू भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. असं असताना दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी साऊथ झोन संघाची घोषणा झाली आहे. या संघात एका मोठ्या खेळाडूला स्थान मिळालं नाही. रिपोर्टनुसार, हा खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये नापास झाला आणि त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कर्नाटकचा युवा वेगवान गोलंदाजा विजयकुमार वैशाक बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसच्या फिटनेस चाचणीत नापास झाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी फिटनेस चाचणी पास करणं आवश्यक असतं. पण वैशाक या चाचणीत फेल झाला आहे. त्यामुळे साउथ झोनचं टेन्शन वाढलं आहे. कारण वैशाक हा चांगला गोलंदाज असून त्याच्या असण्याने संघाच्या गोलंदाजीची ताकद वाढली असती. विजयकुमार वैशाकने 26 फर्स्ट क्लास सामन्यात 103 विकेट घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी फक्त 23.88 असून चांगली आहे.
दुलीप ट्रॉफी 2025 च्या उपांत्य सामन्यासाठी 28 वर्षीय विजयकुमारचा संघात समावेश करण्यात आला होता. पण 4 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या नॉर्थ झोनविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो एका अज्ञात दुखापतीने ग्रस्त आहे.आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी विजयकुमारला क्वाड दुखापतीने त्रस्त होता. पण तो त्यातून पूर्णपणे बरा झाला आणि आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसाठी शानदार कामगिरी केली. विजयकुमार वैशाकऐवजी कर्नाटक संघातील सहकारी वासुकी कौशिकचा साउथ झोन संघात समावेश करण्यात आला आहे.
साउथ झोनचे कर्णधारपद केरळच्या अझरुद्दीनकडे सोपवण्यात आलं आहे. यापूर्वी ही जबाबदारी तिलक वर्माकडे सोपवली होती. पण आशिया कप स्पर्धेत त्याची निवड झाली आणि जबाबदारी अझरुद्दीकडे आली. नारायण जगदीसन याच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. तामिळनाडूचा फिरकीपटून साई किशोर देखील दुखापतीमुळे या सामन्याला मुकला आहे. तिलक वर्माच्या जागी शेख राशीद आणि साई किशोरच्या जागी अंकित शर्माला संधी देण्यात आली आहे.
दुलीप ट्रॉफीसाठी साउथ झोन संघ : मोहम्मद अझरुद्दीन (कर्णधार), तन्मय अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, मोहित काळे, सलमान निझार, नारायण जगदीसन (उपकर्णधार), टी विजय, अंकित शर्मा, तनय त्यागराजन, वासुकी कौशिक, एमडी निधिश, रिकी भुई, बासिल एनपी, गुर्जपनेत कुमार शेख, गुर्जपनेत कुमार, शेखर कुमार, शेख, राजकुमार कौशिक.