ENG vs IND : इंग्लंड-इंडिया टेस्ट सीरिजनंतर स्टार खेळाडूचा अचानक मोठा निर्णय, टीमला मोठा झटका
GH News September 01, 2025 09:19 PM

भारतीय क्रिकेट संघाने अवघ्या काही आठवड्यांपूर्वी इंग्लंड दौऱ्याचा गोड शेवट केला. भारताने इंग्लंडला 5 सामन्यांची कसोटी मालिका जिंकण्यापासून रोखलं. भारताने पाचवा आणि अंतिम कसोटी सामना जिंकून मालिका 2-2 ने बरोबरीत राखली. भारताने कर्णधार शुबमन गिल याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. शुबमनची कसोटी कर्णधार म्हणून ही पहिलीच मालिका होती. शुबमनने या मालिकेत 4 शतकं आणि 1 द्विशतकासह 700 पेक्षा अधिक धावा केल्या. या मालिकेच्या काही दिवसांनंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे. स्टार खेळाडूने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी काही दिवसांची विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंडच्या जेमी ओव्हरटन याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. जेमी ओव्हरटन याने रेड बॉल क्रिकेटमधून काही दिवसांची विश्रांती घेत असल्याचं 1 सप्टेंबरला जाहीर केलं. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

ब्रेक घेण्याचं कारण काय?

व्हाईट बॉल क्रिकेटकडे (वनडे, टी 20I आणि लीग स्पर्धा) लक्ष केंद्रीत करण्यासाठी जेमी ओव्हरटन याने हा निर्णय घेतला आहे. ओव्हरटन याला दीर्घकाळ व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये खेळायचं आहे. त्यामुळे ओव्हरटन याने असा निर्णय घेतलाय. ओव्हरटनच्या या निर्णयामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाला झटका लागला आहे. मात्र इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ओव्हरटन याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

जेमी ओव्हरटन याने कसोटी कारकीर्दीत एकूण 2 सामनेच खेळले आहेत. जेमीने कसोटी कारकीर्दीतील शेवटचा सामना हा टीम इंडिया विरुद्ध खेळला होता. टीम इंडिया विरुद्ध झालेल्या पाचव्या सामन्यात जेमी ओव्हरटन इंग्लंडच्या प्लेइंग ईलेव्हनचा भाग होता. जेमीने कसोटी कारकीर्दीतील 2 सामन्यांमध्ये 4 विकेट्स घेतल्यास आहेत. तसेच 106 धावा केल्या आहेत.

ओव्हरटन काय म्हणाला?

मी कारकीर्दीच्या अशा टप्प्यावर आहे जिथे मी सलग 12 महिने खेळू शकत नाही. माझ्यासाठी हे शारिरीक आणि मानसिकरित्या शक्य नसल्याचं ओव्हरटन याने म्हटलं. मात्र फर्स्ट क्लास क्रिकेटच हे आपल्या कारकीर्दीचा भक्कम पाया आहे, असं ओव्हरटन याने नमूद केलं.

ओव्हरटनचा मोठा निर्णय

ओव्हरटनची फर्स्ट क्लास क्रिकेट कारकीर्द

इंग्लंडला वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्रतिष्ठेची एशेज सीरिज खेळायची आहे. ओव्हरटन या मालिकेसाठी प्रबळ दावेदार होता. मात्र ओव्हरटन याच्या निर्णयामुळे निवड समितीला दुसर्‍या पर्यायाचा विचार करावा लागणार आहे.

ओव्हरटनने समरसेटसाठी काउंटी चॅम्पियनशीपमध्ये अनेक सामने खेळले आहेत. तसचे ओव्हरटनने 99 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 239 विकेट्स मिळवल्या आहेत. तसेच जेमीने 2 हजार 410 धावा केल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.