संदीप भोसले
लातूर : पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या चार जणांनी गोंधळ घालत राडा केला. किरकोळ कारणावरून निर्माण झालेल्या वादातून हा गोंधळ घालत या चौघांनी मिळून पंपावरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
लातूरच्या औसा तालुक्यातील किल्लारी येथील पेट्रोल पंपावर जबर मारहाणीची घटना घडली आहे. किल्लारी येथील पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या चार जणांनी किरकोळ कारणावरून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याशी वाद घालण्यास सुरवात केली. यानंतर त्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाणकेली आहे. लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्याची घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
Ganesh Festival : सातासमुद्रापार गणरायांची आराधना; विदेशातील महाकाय जहाजावर बाप्पाची स्थापनाचौघांवर गुन्हा दाखल
दरम्यान या घटनेनंतर पंपावर एकच गोंधळ पाहायला मिळाला. काही जणांनी मध्यस्थी करत कर्मचाऱ्याला सोडविले. संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी सदर कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून किल्लारी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
Hingoli Heavy Rain : हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका; कापूस, सोयाबीनचे सर्वाधिक नुकसानमहागड्या पैठणीची चोरी सीसीटीव्ही मध्ये कैद
नाशिकच्या येवला शहरातील बुरुड गल्लीत असलेल्या सुरेखा पैठणी दुकानात पैठणी खरेदीसाठी आलेल्या दोन महिलांनी दुकानदाराला पैठणी दाखवण्यास सांगत बोलण्यात गुंतवून सुमारे १ लाख ७० हजार रुपये किमतीच्या महागड्या पैठणीची बेमालूम पद्धतीने पैठणीची चोरी केल्या. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पैठणी दाखवत असताना उभ्या असलेल्या महिलेने दुकानदारांची नजर चकवून पैठणी अंगावरील साडीत लपवली ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.