5 राशींवर होणार माता लक्ष्मीची कृपा ! शुक्रादित्य योगामुळे होणार धनाचा वर्षाव आणि नवीन संधी
esakal September 06, 2025 02:45 AM

Marathi Rashi Fal News 2025 : येत्या 15 सप्टेंबरला शुक्र सिंह राशीत भ्रमण करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र आणि सूर्याचे संबंध चांगले मानले जात नाहीत. त्यामुळे हा योग तितकासा चांगला नाहीये. पण या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे कारण सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे.

या भ्रमणाचा फायदा पाच राशींना होणार आहे. पाच राशींच्या करिअरमध्ये वृद्धी, धनलाभ तसेच वैवाहिक सुखाचे योग आहेत. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊया.

मेष रास :

मेष राशीच्या लोकांच्या प्रेमजीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. आर्थिक स्थिती चांगली असेल आणि आर्थिक कार्यात सफलता मिळेल. अविवाहितांना आलेल्या नवीन स्थळांमधून त्यांचा जीवनसाथी भेटले. तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक गोष्टीत साथ देईल. तुमचे एकमेकांबरोबरचे संबंध मजबूत होतील. क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सन्मान प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्यांच्या पगारात वाढ होईल.

मिथुन रास :

मिथुन राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये बदल होतील. चांगल्या संधी चालून येतील. नात्यांचं महत्त्व समजून येईल. भावंडांशी संबंध सुधारतील. कामाच्या निमित्ताने छोट्या यात्रा कराल. गुंतवणूक करू नका.

सिंह रास :

सिंह राशीत शुक्रादित्य योग बनल्यामुळे उत्तम कमाईच्या संधी निर्माण होतील. नाती आणखी घट्ट होतील. वेळ उत्तम जाईल आणि चांगल्या संधी प्राप्त होईल. कामात प्रगती होईल. वैवाहिक संबंध चांगले असतील. व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवाल.

तूळ रास :

तूळ राशीला समजत मानसन्मान मिळेल. कामातील तुमच्या मेहनतीवर वरिष्ठ खुश होतील आणि तुमचं कौतुक करतील. तुमचं करिअर आणि कौटुंबिक जीवन चांगलं असेल, भौतिक सुख प्राप्त होईल.

धनु रास :

करिअरमध्ये प्रगती होईल. घाईत कोणतेही निर्णय घेऊ नका. कामानिमित्त केलेले प्रवास सफल होतील. कुटूंबातील नातेसंबंध सुधारतील. कुटूंबासोबत दूरच प्रवास कराल. कामाचा ताण राहील पण मेहनतीमुळे वरिष्ठ खुश होतील.

Ganesh Chaturthi 2025 : 'या' गणेश चतुर्थीला एक-दोन नाही तर बनत आहेत 5 महायोग; या राशींवर बाप्पा होणार खुश
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.