आशिया कप स्पर्धेपू्र्वी श्रीलंकेला पराभवाचा धक्का, दुबळ्या संघाने 80 धावांवरच केलं गारद
GH News September 06, 2025 11:17 PM

श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना हरारे मैदानात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हे झिम्बाब्वेच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकन संघाने प्रथम फलंदाजी करताना 17.4 षटकात 80 धावांवर बाद झाला. तसेच श्रीलंकेसमोर विजयासाठी 81 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान झिम्बाब्वेने 14.2 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. यासह मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंका म्हणाले की, ‘पॉवरप्लेमध्ये आम्ही खूप विकेट्स गमावल्या आणि आम्हाला हवी तशी सुरुवात झाली नाही. जेव्हा मी फलंदाजी करत होतो तेव्हा मला वाटले होते की 130-140 च्या आसपासचा स्कोअर चांगला असेल, तो बेल्टर नव्हता पण आम्ही अधिक चांगली फलंदाजी करू शकलो असतो. या फॉरमॅटमध्ये 80 पुरेसे नाही.’

झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा म्हणाला की, खूप आनंद झाला. आम्ही चांगले क्रिकेट खेळण्याच्या जवळ आहोत असे आम्ही म्हणत राहिलो, निकालाच्या दुसऱ्या बाजूला असणे छान आहे. सर्वांनाच सुटकेचा निश्वास आहे. पराभवामुळे आम्ही थोडे नाराज होतो, आम्ही जवळ येत होतो पण रेषा ओलांडत नव्हतो, आजचे सौंदर्य म्हणजे आम्ही क्लिनिकल होतो. आशा आहे की कामगिरी चांगली होत राहते. आम्हाला त्यांच्या क्षमतेवर कधीही शंका नव्हती.’ आम्ही सामने जिंकतो पण मालिका जिंकत नाही, परंतु आम्ही उद्या आमचे सर्वस्व देऊ आणि मालिका जिंकण्याचा प्रयत्न करू, असंही सिकंदर रझा पुढे म्हणाला.

श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यातील मालिकेतील निर्णायक असा शेवटचा सामना 7 सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर श्रीलंकन संघ आशिया कप स्पर्धेसाठी युएईला येणार आहे. आशिया कप स्पर्धेत श्रीलंकेचा पहिला सामना बांगलादेशशी 13 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेआधी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. आता शेवटचा सामना जिंकून मालिका विजयाचं आव्हान श्रीलंकेसमोर असणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कामिल मिश्रा, नुवानिडू फर्नांडो, चरिथ असालंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, दुशान हेमंथा, दुष्मंथा चमीरा, महेश थेकशाना, बिनुरा फर्नांडो.

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमनी (विकेटकीपर), शॉन विल्यम्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, ताशिंगा मुसेकिवा, टोनी मुन्योंगा, ब्रॅड इव्हान्स, टिनोटें.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.