Political Astrology : फडणवीसांसाठी कटकटीचा काळ ते राज्याच्या राजकारणात मोठ्या फेरबदलाची शक्यता...जाणून घ्या या आठवड्याचं राजकीय भविष्य!
esakal September 07, 2025 10:45 PM

Astrology predictions suggest challenging times for Devendra Fadnavis until 2027 with political hurdles ahead : मंगळाचे कन्या राशीतील भ्रमण १३ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे १३ सप्टेंबरपर्यंत काळ मुख्यमंत्र्यांसाठी कटकटीचा ठरणार आहे. पण त्याचबरोबर सात सप्टेंबरचे चंद्रग्रहण आणि २१ सप्टेंबरचे सूर्यग्रहण मुख्यमंत्री व महाराष्ट्रासाठी प्रतिकूल राहू शकते, असं भाकीत ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवलेलं आहे. महाराष्ट्राची धनू रास असून, कन्या राशीचा मंगळ दशमात भ्रमण करीत असल्याने महाराष्ट्र व विशेषतः मुंबईमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. या प्रतिकूल ग्रहणाचा परिणाम महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर होण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७०चा असून, त्यांची कुंभ रास आहे. या राशीला साडेसाती असून, साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू आहे. मागील पाच वर्षे साडेसाती सुरू असून, याच काळामध्ये फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली आहे. २०१४ ते २०१९च्या तुलनेत २०२४नंतर त्यांना मिळालेले मुख्यमंत्रिपद त्यांच्यासाठी कटकटीचे ठरले आहे. पक्षाला आणि महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असूनही, महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे, असं ते म्हणाले.

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या मनात काय, ते...दिसेल; ठाकरे बंधूंच्या भेटीवर फडणवीसांचे सूचक विधान

सात ते २१ सप्टेंबर या काळात मोठ्या घटना महाराष्ट्रामध्ये अनुभवास येतील. याची तीव्रता १५ ऑक्टोबरपर्यंत राहू शकते. या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मुख्यमंत्र्यांना जून २०२७पर्यंत साडेसाती असल्यामुळे, तोपर्यंत अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागेल. मात्र, जून २०२७नंतर केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता असून, केंद्रातील राजकारणामध्ये फडणवीस यांचे महत्त्व वाढू शकते. आगामी काळात पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत फडणवीस यांचे अग्रक्रमाने येण्याची शक्यता वाटते, असंही त्यांनी नमूद केलं.

सात सप्टेंबरच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये वृषभ लग्न उदित असून, दशम स्थानात कुंभ राशीत पूर्वाभाद्रपदा नक्षत्रात पौर्णिमा होत आहे. दशमात चंद्र राहू, चतुर्थात रवी-केतू बुध, लग्नी हर्षल, धनस्थानी गुरू, तृतीयात शुक्र, पंचमात मंगळ व लाभस्थानी शनी नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे. एकूण ग्रहस्थितीचा विचार करता राहूयुक्त पौर्णिमा दशमात होत असून, लाभातील शनी-नेपच्यून योगामुळे राजकीय क्षेत्रात मोठे गोंधळ व नाट्यमय घटना होण्याची शक्यता वाटते, असंही ते म्हणाले.

CM Devendra Fadnavis: महादेव मुंडे खून प्रकरणाचा विविध मार्गांनी तपास सुरू मुख्यमंत्री; कोणालाही पाठीशी घालणार नाही

चतुर्थातील रवी-केतू युतीमुळे मोठ्या पक्षात फूट पडेल. मोठ्या व्यक्तींचे राजीनामे होतील. सरकारी अधिकारी, मंत्री व प्रमुख व्यक्तींवर आरोप होऊन मोठ्या पदावरील व्यक्तींना राजीनामे द्यावे लागतील. पावसाळी अधिवेशन मोठ्या गोंधळात पार पडेल. या काळात नेतृत्वबदल, मंत्रिमंडळातील फेरबदल होऊन नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता राहील, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.