चाकण, ता. ८ : कडाचीवाडी (ता. खेड) येथील प्रति रांजणगावचा गणपती समजल्या जाणाऱ्या पुरातन गणेश मंदिरात अनंतचतुर्दशी निमित्ताने (ता. ६) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या पुरातन गणेश मंदिरात भाविकांची १० दिवस दर्शन घेण्यासाठी गर्दी होती. गणेशोत्सवानिमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती. रविवारी सायंकाळी चार वाजता महापूजा करण्यात आली. त्यानंतर सात नंतर संगीत प्रवचन "लागला नामाचा छंद हे प्रवचनकार नीलम पोतले- वडघुले यांनी सादर केले. त्यांना गायन साथसंगत तेजश्री भुजबळ, तबला साथ रोहितमहाराज वडिले यांनी दिली. त्यानंतर महाआरती झाली व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या विविध कार्यक्रमांचे आयोजन गणेशनगर मित्र मंडळ व ग्रामस्थ यांनी केले होते.