उत्तर काश्मीरमधील कथित मास गेव्ह्स म्हणजे सामूहिक कबरींबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या कबरी कुणाच्य आहेत यावर अनेक वेळा चर्चा झाली. पण त्यातून ठोस काही उत्तर मिळालेलं नाहीये. आंतरराष्ट्रीय मंचावर अनेक नरेटिव्ह मांडण्यात आले. काश्मीर खोऱ्यात निष्पाप नागरिकांना ठार करून त्यांचा गुपचूप दफनविधी करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं. पण त्यात काहीच तथ्य नसल्याचं समोर आलं. आता एका एनजीओच्या अभ्यासातून या कबरींविषयीची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
एका एनजीओने या सर्व कबरींची म्हणजे 4,056 कबरींची पाहणी केली. त्यातील 90 टक्के कबरी या विदेशी आणि स्थानिक दहशतवाद्यांच्या असल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे ज्या कबरींना चिन्ह नव्हते त्या सर्व कबरी दहशतवाद्यांच्या असल्याचं समोर आलं आहे. काश्मीर येथील सेव्ह यूथ सेव्ह फ्यूचर फाऊंडेशन नावाच्या एनजीओच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक वर्षानंतर सत्य समोर आलं आहे. काश्मीर खोऱ्यातील या चिन्ह नसलेल्या आणि अज्ञात कबरींचा गंभीरपणे अभ्यास सुरू करण्यात आला आहे.
373 कबरींचा सर्व्हेवजहत फारूक भट, ज़ाहिद सुल्तान, इरशाद अहमद भट, अनिका नाज़िर, मुदस्सिर अहमद डार आणि शबीर अहमद यांच्या नेतृत्वात या कबरींचा अभ्यास करण्यात आला. उत्तर काश्मीरच्या बारामूला आणि बांदीपोरा तसेच मध्य काश्मीरच्या गांदरबल येथील 373 कबरींचा सर्व्हे करून दस्ताऐवज करण्यात आले. हा प्रकल्प 2018मध्ये सुरू करण्यात आला. 2024मध्ये तो पूर्ण झाला. त्यानंतर विविध सरकारी कार्यालयात ही रिपोर्ट पाठवण्यात आल्याचं वजहत फारूख भट यांनी सांगितलं.
रिपोर्टमध्ये काय आलं?या रिपोर्टमध्ये महत्त्वाची तथ्य देण्यात आली आहे. एकूण 2,493 कबरी (म्हणजे 61.5 टक्के) विदेशी दहशतवाद्यांच्या आहेत. सुरक्षा दलाने चालवलेल्या दहशतवाद विरोधी अभियानात या दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं. या अतिरेक्यांकडे कोणतेही ओळखपत्र नव्हते. आपलं नेटवर्क उघड होऊ नये आणि पाकिस्तानवरही आळ येऊ नये हा त्यामागचा हेतू होता.
सुमारे 1,208 कबरी (जवळपास 29.8 टक्के) स्थानिक काश्मिरी दहशतवाद्यांच्या असल्याचं दिसून आलं. सुरक्षा दलाने या अतिरेक्यांना चकमकीत कंठस्नान घातलं होतं. यातील अनेक कबरींबाबत स्थानिक आणि मृतांच्या नातेवाईकांनी कबुली दिली आहे.
यात 9 कबरींची ओळख पटली आहे. या रिपोर्टमुळे मागचे सर्व दावे निकाली निघाले आहेत. स्थानिक नागरिकांची सामूहिक हत्या करून त्यांना दफन करण्यात आल्याचा दावाही निकाली निघाला आहे. या अभ्यासात 1947 च्या काश्मीर युद्धात मारण्यात आलेल्या 70 आदिवासी आक्रमकांच्या कबरींचीही ओळख पटली आहे.
या कबरींचा खुलासा नाहीदरम्यान, आतापर्यंत 276 कबरींची ओळख पटलेली नाही. या सर्व कबरींची विना चिन्हवाल्या कबरींशी डीएनए चाचणी घेण्यात आली पाहिजे. तरच ओळख न पटलेल्या कबरी कुणाच्या हे स्पष्ट होणार आहे. हा रिसर्च करण्यासाठी विविध पक्ष, स्थानिक धर्मगुरू, औकाफ मशीद समितीचे सदस्य, कबरी खोदणारे आणइ स्थानिक दहशतवादी आणि बेपत्ता झालेल्या लोकांच्या कुटुंबांची मदत झाली.