अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने मोठा टॅरिफ लावला. या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेत मोठा तणाव बघायला मिळतोय. मात्र, एकीकडे टॅरिफच्या मुद्द्यावरून भारताच्या विरोधात आग ओकणारी अमेरिका दुसरीकडे पाकिस्तानसोबत मोठे करार करताना दिसतंय. यातून डोनाल्ड ट्रम्प यांची दुटप्पी भूमिका स्पष्ट होताना दिसतंय. हेच नाही तर पाकिस्तानला हाताशी धरून भारतावर मोठा गेम करण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प हे दिसत आहेत. आता नुकताच भारताला धक्का देणारी आणि खळबळ उडवणारी माहिती पुढे आलीये. ज्यानंतर भारताचे टेन्शन वाढलंय.
अमेरिकेच्या धातू कंपनीने नुकताच पाकिस्तानसोबत तब्बल 50 करोड डॉलरचा खनिज करार केला. या करारावर सह्या देखील झाल्या आहेत. हा भारताला अत्यंत मोठा धक्काच म्हणावा लागेल. पाकिस्तानातील सर्वात मोठ्या महत्त्वाच्या खनिजांच्या खाणकाम करणाऱ्या पाकिस्तानच्या फ्रंटियर वर्क्स ऑर्गनायझेशनने मिसूरीस्थित यूएस स्ट्रॅटेजिक मेटल्ससोबत सहकार्य योजनांसाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. याचा फायदा थेट पाकिस्तानला होणार आहे.
या करारानुसार, पाकिस्तानमध्ये एक पॉली मेटॅलिक रिफायनरी उभारली जाईल. गेल्या महिन्यात वॉशिंग्टन आणि इस्लामाबाद यांच्यात व्यापार करार झाल्यानंतर हा करार झाला आहे. यामुळे पाकिस्तानला मदतीला घेऊन अमेरिका भारताला धक्के देताना दिसत आहे. एकीकडे भारतावर मोठा टॅरिफ लावून भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आणण्याचा डाव डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे. दुसरीकडे मात्र पाकिस्तानसोबत मोठे करार केले जात आहेत.
अमेरिकन कंपनी पाकिस्तानमधील खनिजे आणि तेलाच्या साठ्यांचा शोध घेण्यासाठी गुंतवणूक करतंय. यूएस स्ट्रॅटेजिक मेटल्स महत्त्वपूर्ण खनिजे तयार करते आणि पुनर्वापर करते. मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अमेरिकेतील जवळीकता चांगलीच वाढल्याचे बघायला मिळतंय. मात्र, दोन्ही देश मिळून भारताच्या विरोधात कट रचत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तीन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या लष्करातील मोठे विमान अचानक पाकिस्तानच्या महत्वाच्या आर्मी एअरबेसवर उतरले, ज्यानंतर एकच खळबळ उडाली. आता दोन्ही देशांमध्ये मोठा करारा झाला असून भारताची डोकेदुखी वाढल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसतंय.