आशिया चषक २०२५ उद्यापासून सुरू होत असून १० सप्टेंबरला भारताचा पहिला सामना खेळला जाणार आहे.
संजू सॅमसन आणि शुभमन गिल यांच्यात सलामीच्या क्रमांकावरून तगडा पेच निर्माण झाला आहे.
माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संजू सॅमसनला सलामीला खेळू द्यावे आणि गिलसाठी दुसरी जागा शोधावी असा सल्ला दिला.
आशिया चषक २०२५ स्पर्धा उद्यापासून सुरू होतेय आणि १० सप्टेंबरला भारताचा पहिला सामना होणार आहे. भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळेल, याची उत्सुकता आहेच. त्याचवेळी संजू सॅमसन विरुद्ध शुभमन गिल यांच्यात सलामीच्या क्रमावरून सामना रंगताना दिसतोय. शुभमन उप कर्णधार म्हणून ट्वेंटी-२० संघात परतल्याने संजूचे सलामीचे स्थान धोक्यात आले आहे. अनेकांनी संजूला तिसऱ्या, चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळवण्याचा सल्ला दिला. पण, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी गौतम गंभीरला सल्ला दिला आहे.
संजू सॅमसनला एकटं सोडा आणि त्याला सलामीला खेळू द्या, अशी रवी शास्त्री यांची इच्छा आहे. त्यांनी गौतम गंभीर व संघ व्यवस्थापनाला शुभमन गिलसाठी अंतिम ११ मध्ये दुसरी जागा शोधा असा सल्ला दिला आहे. सलामीवीर म्हणून संजूचा रेकॉर्ड दमदार आहे, असे माजी मुख्य प्रशिक्षकांना वाटते. आशिया चषक स्पर्धेसाठीच्या संघात संजू व अभिषेक शर्मा या हे दोन्ही सलामीवीर आहेत. त्यात शुभमनच्या समावेशामुळे एकाचे स्थान धोक्यात आले आहे. तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यामुळे पेच आणखी वाढला आहे.
Asia Cup 2025 : भारत, पाकिस्तानसह सर्व ८ संघ जाहीर; कोणती टीम तगडी, कुठे Live पाहता येणार? सामन्यांच्या वेळेत झाला बदल'संजू सॅमसन हा आघाडीच्या तीन क्रमांकावर फलंदाजीसाठी आल्यास प्रतिस्पर्धीसाठी धोकादायक ठरतो. त्याने वरच्या क्रमांकावर खेळून भारताला सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे त्याला तिथेच सोडा. त्यामुळे त्याच्याजागी गिलला रिप्लेस करणे, एवढं सोपं नाही. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये आघाडीला संजूचा रेकॉर्ड चांगला आहे. गिल दुसऱ्या कोणत्याही क्रमांकावर येऊ शकतो. सॅमसनने सलामीला येऊन जसा खेळत आला आहे, तसाच आक्रमक खेळ करावा,'असे मत शास्त्री यांनी व्यक्त केले.
रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यानंतर ट्वेंटी-२०त भारताकडून सर्वाधिक शतकांच्या बाबतीत संजूचा क्रमांक येतो. यूएईची परिस्थिती ही फिरकीसाठी पोषक आहे. 'दुबईतील उष्ण वातावरण फिरकीसाठी पोषक आहे. अफगाणिस्तानसारखा संघ चार फिरकीपटूंसह खेळताना दिसेल. भारतीय संघ दोन किंवा तीन फिरकीपटूंसह खेळेल का, हे संघाच्या संतुलनावर अवलंबून आहे,'असेही शास्त्री म्हणाले.
श्रेयस अय्यर IN, जसप्रीत बुमराह OUT! सर्फराज खानचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा असेल संघभारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.