स्मार्टफोन हा आज आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. विना मोबाईल तर काही जण राहूच शकत नाहीत. पण स्मार्टफोन आणि इटरनेटमुळे धोके सुद्धा वाढले आहेत. तुमचा मोबाईल हॅक होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढली आहे. सायबर भामटे तुमच्या खासगी आयुष्यात डोकावतात. हे 5 संकेत तुमचा मोबाईल हॅक झाला की नाही हे सांगतात.
तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपत असेल. लगेचच ड्रेन होत असेल तर समजून जा फोन हॅक झाला आहे. हॅकर्स तुमच्या नकळत गरज नसलेले ॲप्स आणि मेलवेअर इन्स्टॉल करतात. बॅटरी खराब झाली असेल तर वेगळी गोष्ट आहे.
हेरगिरी करणारी ही ॲप्स स्मार्टफोनचे लोकेशन ट्रॅक करतात. त्यामुळे डेटा आणि बॅटरी दोन्ही लवकर संपतात. हार्डवेअरवर दबाव आल्याने मग स्मार्टफोन ओव्हरहीट होतो.
फोन हॅक झाला असेल, मेलवेअर असेल तर तुमचा डेटा लवकर संपतो. मेलवेअरमुळे डेटाचा वापर वाढतो. झटपट डेटा संपत असेल आणि त्याचा तुमचा तितका वापर नसेल तर मग अलर्ट व्हा.
जर तुमचा मोबाईल वेळेत उघडत नसेल. त्याची स्क्रीन ब्लिंक होत असेल. वारंवार क्रॅश होत असेल तर कदाचित तुमचा स्मार्टफोन हॅक झाला असेल. स्मार्टफोन हँग होत असेल तरी मेलवेअरचा फटका तर बसला नाही ना हे चेक करा.
तुम्ही कॅमेरा ऑन केलेला नाही. सुरु केलेला नाही. तरीही फोनमध्ये ग्रीन डॉट दिसत असेल तर लागलीच सावध व्हा. तुमचा फोन हॅक झाल्याची ही लक्षणं आहेत. लागलीच तज्ज्ञाकडे धाव घ्या. (image credit AI)