मोठी बातमी! माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळलं, घरच दिलं पेटवून, हादरवून टाकणारा विध्वंस
GH News September 09, 2025 10:19 PM

नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदी आणि भ्रष्टाचारा विरोधात सुरु असलेले आंदोलन एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे. एक धक्कादायक बातमी आता समोर येत आहे. आंदोलकांनी माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले आहे. जळालेल्या अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. नेमकं काय झालं चला जाणून घेऊया…

नेमकं काय घडलं?

नेपाळचे माजी पंतप्रधान झालानाथ खनाल यांच्या घरावर हल्ला झाला. आंदोलकांनी त्यांच्या घराला आग लावली. खनाल यांच्या पत्नी राज्यलक्ष्मी चित्रकार या घरातच होत्या. आंदोलकांनी त्यांना लक्ष्य केले. घराला लागलेल्या आगीत त्या गंभीर भाजल्या आणि त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दल्लू येथील त्यांच्या निवासस्थानी घडली. आंदोलकांनी आग लावताना राज्यलक्ष्मी यांना आत कोंडले होते. त्यामुळे त्यांना स्वत:चा जीव वाचवता आला नाही.

वाचा: मंडळाच्या कार्यकर्त्यांना माज चढला, तोच उतरविण्यासाठी…; लालबाग राजाच्या विसर्जनानंतर कोणी पाठवलं CMला पत्र

डॉक्टरांनी मृत घोषित केले

सूत्रांनुसार, खनाल यांच्या पत्नी राज्यलक्ष्मी यांना जळालेल्या अवस्थेत कीर्तिपूर बर्न हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे जगात खळबळ माजली आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या Gen Z आंदोलनाला आता आणखी हिंसक वळण आले आहे. अधिकाऱ्यांकडून या हल्ल्याबाबत अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.

खनाल यांना सैन्याने वाचवले

सीपीएन (युनिफाइड सोशलिस्ट) पक्षाचे नेते नरेश शाही यांच्या मते, आंदोलकांनी खनाल यांच्या घरात आग लावली. त्यामुळे त्यांच्या पत्नी गंभीररित्या जखमी झाल्या. जेव्हा आंदोलकांनी आग लावली, तेव्हा त्या त्यांचा मुलगा निर्भीक खनाल यांच्यासह घरी होत्या. आगीमध्ये जळाल्यानंतर त्यांना छावणी येथील नेपाळी सैन्याच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथून त्यांना तातडीने कीर्तिपूर रुग्णालयात हलवण्यात आले. झालानाथ खनाल यांना घराला आग लागण्यापूर्वी नेपाळी सैन्याने वाचवले होते.

कोण आहेत झालानाथ कनाल

झालानाथ खनाल हे नेपाळचे 35वे पंतप्रधान होते आणि फेब्रुवारी 2011 ते ऑगस्ट 2011 पर्यंत त्यांनी या पदाची जबाबदारी सांभाळली होती. ते नेपाळच्या कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्षही राहिले आहेत आणि सीपीएनच्या संविधान सभेच्या संसदीय गटाचे नेते म्हणूनही त्यांनी सेवा दिल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.