विराट कोहलीचं डोकं पहिल्यासारखे राहिलं नाही, मी भेटलो तेव्हा…! दिनेश कार्तिकच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Tv9 Marathi September 10, 2025 05:45 AM

विराट कोहली भारतीय क्रिकेट विश्वातील मोठं नाव.. टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्याने आशिया कप स्पर्धेत दिसणार नाही. मात्र वनडे फॉर्मेटमध्ये त्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा लागून आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी खेळाडूंची फिटनेस टेस्ट पार पडली. त्यातही विराट कोहली पास झाला. त्यामुळे वनडे मालिकेत खेळताना दिसेल अशी आशा आहे. असं असताना माजी क्रिकेट दिनेश कार्तिकने विराट कोहलीबाबत आश्चर्यकार वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नव्या चर्चांना पेव फुटलं आहे. विराट कोहली शरीराने तर फिट आहे, पण त्याचं डोकं पहिल्यासारखं राहिलं नाही, या विधानामुळे चर्चा तर होणारच ना.. दिनेश कार्तिकने असं का सांगितलं? नेमकं काय झालं? असे एक ना अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. विराट कोहली सध्या इंग्लंडमध्ये आहे आणि वनडे फॉर्मेटमध्ये खेळताना दिसणार आहे.

दिनेश कार्तिकने इंडिया टुडेच्या कान्क्लेवमध्ये सांगितलं की, निश्चित आता एक फॉर्मेट खेळत असेल पण आजही शारीरिकदृष्ट्या फिट आहे. तो एक असा खेळाडू आहे त्याच्या जीवनात येणारे सर्व अडथले झेलण्याची ताकद ठेवतो. विराट कोहली देशातील तरूणाईचा रोल मॉडेल आहे, असंही दिनेश कार्तिक म्हणाला. त्याने आक्रमकता फक्त आक्रमकतेचा देखावा केला नाही, तर त्याने आपली प्रतिभाही सिद्ध करून दाखवली. कोणत्याही फॉर्मेटमध्ये विराटने बॅटने काम करून दाखवलं आहे. त्याच्या कामगिरीत सातत्य दिसून आले आहे. दिनेश कार्तिक पुढे म्हणाला की, मी विराट कोहलीसोबत बराच वेळ घालवला आहे. म्हणून मी सांगू शकतो की तो मोठ्या सामन्याचा खेळाडू आहे.

विराट कोहलीच्या फिटनेसबाबत दिनेश कार्तिकला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने विराटला इंग्लंड भेटल्यानंतर काही गोष्टी शेअर केल्या. दिनेश कार्तिक म्हणाला की, विराट कोहली खूप आनंदी आहे. आपण त्याने घेतलेल्या निर्णयाचा आदर केला पाहीजे. विराटचे शरीर अजूनही फिटच आहे. पण त्याचं डोकं पहिल्यासारख राहिलेलं नाही. पण त्याला आता कळलं की काय करायला हवं तर त्याच्या निर्णयाचा आदर करायला पाहीजे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.