सोलापूर: बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून त्यांना अनुसूचित जमाती (एसटी) मधून आरक्षण द्यावे, अशी मागणी सेवा फाउंडेशनचे मिथुन राठोड यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. या मागणीसाठी बुधवारी (ता. १७) बंजारा समाजाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहितीही राठोड यांनी दिली.
Smart Meter: मीटरचा हिशोब ‘स्मार्ट’ की फसवा?; वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक संतप्त, दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात रांगाअनेक वर्षांपासून बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणी प्रलंबित आहे. एकच खानपान, राहणीमान, वेशभूषा, केशभूषा आणि एकच बोलीभाषा असणाऱ्या बंजारा समाजाचा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये समावेश करण्यात आला आहे. आंध्रा तेलंगणामध्ये एस.टी. प्रवर्गात कर्नाटकमध्ये एस सी. प्रवर्गात, गुजरात व हरियाणामध्ये ओबीसी, दिल्लीत एससी तर महाराष्ट्रामध्ये व्ही. जे. प्रवर्गामध्ये समावेश आहे. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेट लागू करण्याचे आदेश काढले आहेत.
त्यानुसार हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला तत्काळ एस.टी. आरक्षण लागू करावे, तसा अध्यादेश शासनाने काढावा, अशी मागणीही राठोड यांनी केली आहे. हैदराबाद गॅझेट मध्ये बंजारा समाजाच्या नोंदीचे पुरावे आहेत. ४० ते ४५ वर्षापासून बंजारा समाजाची वन कास्ट, वन नेशन, वन रिझर्वेशन ही जुनी मागणी जोर धरत आहे.
Honesty Employee :'साईंच्या दरबारातील टोकाचा विरोधाभास'; कंत्राटी कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरातून कौतुकहैदराबाद गॅझेटच्या आधारे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील समस्त बंजारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी तांड्या तांड्यामधील बंजारा समाज सक्रिय झाला असून प्रत्येक तांड्यामध्ये जनजागृती चालू आहे, असेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी प्रकाश राठोड, सूरज राठोड, राहुल राठोड, विनोद राठोड, संतोष जाधव आदी उपस्थित होते.