महाराष्ट्रात लवकरच "नो PUC नो फ्युएल" धोरण लागू होणार
प्रत्येक पेट्रोल पंपावर वाहनांचे PUC स्कॅन करून इंधन दिलं जाणार
अवैध प्रमाणपत्र निर्मिती रोखण्यासाठी UID आधारित प्रणाली लागू
वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्काळ PUC मिळवण्याची सुविधा उपलब्ध
मुंबई : भविष्यातील पिढीला प्रदूषण मुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनाला दिलं जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) हे वैध असणे गरजेचं आहे. बेकायदेशीर मार्गाने प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे. यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोलपंपावर 'नो पीयूसी नो फ्युएल' उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी, असे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत.
मंत्री सरनाईक काय म्हणाले?'राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला (स्कॅन करून ) जाईल. या माध्यमातून संबंधित वाहनाचं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता कळेल. त्या वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसेल, असे मंत्री सरनाईक यांनी म्हटलं.
Dharashiv : ST प्रवाशांचा जीव धोक्यात; महामंडळाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडूनच विभागाचा कारभार उघडसरनाईक पुढे म्हणाले, 'त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाहीत. त्याच पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्याची व्यवस्था केली जाईल. या वाहन चालकाची गैरसोय होणार नाही. या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राला युनिक आयडेंटी (UID) असणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वेळोवेळी वैधता तपासणी केली जाऊ शकते'.
'भविष्यात वाहन विक्री करणाऱ्या शोरूम आणि वाहन दुरुस्ती करणारे गॅरेजमध्येप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल. तसेच रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक वाहनांवर वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असेल. यामुळे प्रदूषण पातळी कमी करण्यास मदत होईल. तसेच अवैध पद्धतीने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी मोठा परिवहन विभागाने मोहीम राबवावी, असा सूचना देखील मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत.
CP Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती; 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून बैठकीत परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये आगीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा लावणे, परिवहन भवन बांधकाम आदी बाबींचा आढावाही घेण्यात आला आहे.