swt1011.jpg
90583
सावंतवाडी ः दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरात सहस्त्र मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.
सावंतवाडीत गणरायाला
सहस्त्र मोदकांचा नैवेद्य
सावंतवाडीः शहरातील उभाबाजार येथील दक्षिणाभिमुख हनुमान मंदिरात संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने हजारो मोदकांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये महिला भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या हनुमान मंदिरात दरवर्षी २१ दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान होतात. या काळात मंडळाद्वारे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विसर्जन मिरवणूकही मोठ्या थाटामाटात काढली जाते. याच परंपरेचा भाग म्हणून प्रत्येक वर्षी संकष्ट चतुर्थीला गणरायाला सहस्त्र मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. यंदाही ही परंपरा कायम राखत हनुमान मंदिरात गणेशमूर्तीसमोर हजारो मोदकांचा नैवेद्य ठेवण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी भक्तिमय वातावरणात नैवेद्य अर्पण केला. यानिमित्त पार पडलेल्या पूजेचा मान अनंत जाधव यांना सपत्नीक देण्यात आला.