मुंबई : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. ९) फेटाळून लावली. न्यायालयाच्या निर्णयामुळे नरेश म्हस्के यांची खासदारकी कायम राहणार आहे.
ठाकरेगटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी म्हस्के यांच्या खासदारकीला निवडणूक याचिकेतून आव्हान दिले होते. न्यायालयाने विचारे यांच्या याचिकेवर प्रदीर्घ सुनावणीनंतर १३ जूनला निर्णय राखून ठेवला होता. न्या. रियाझ छागला यांच्या एकलपीठाने मंगळवारी या याचिकेवर निर्णय देताना विचारे यांची याचिका फेटाळून लावली. तसेच विचारे यांनी म्हस्के यांच्यावर केलेले आरोपही मान्य करण्यास नकार दिला.
Mumbai Local Fight: दे दणा दण... कॉलर पकडली, एकमेकांना ठोसे हाणले; मुंबईच्या लोकलमध्ये फ्री स्टाईल राडा Video Viralलोकसभा निवडणुकीत ठाणेलोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे म्हस्के यांना सात लाख ३४ हजार २३१ मते मिळाली होती, तर विचारे यांना पाच लाख १७ हजार २२० मते मिळाली होती. म्हस्के यांची ठाणे मतदारसंघातून खासदार म्हणून झालेली निवड रद्द करावी आणि मतदारसंघाचे खासदार म्हणून आपली निवड करावी, अशी मागणी विचारे यांनी याचिकेद्वारे केली होती.
आरोप कोणते?एका दंगलीच्या प्रकरणात म्हस्के यांना दोषी ठरवण्यात आले असतानाही म्हस्के यांच्या उमेदवारी अर्जात कधीही दोषी ठरवले नसल्याचा दावा केला होता. तसेच ठाणे सत्र न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळल्याचा आरोपही विचारे यांनी याचिकेत केला होता.
Eknath Shinde: दहिसर ‘टोल’चे स्थलांतर होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश