Shreyas Iyer च्या एका पायाला अर्धांगवायू झाला होता, वेदना भयानक होत्या; धक्कादायक खुलासा, क्रिकेटविश्व हादरले
esakal September 11, 2025 12:45 PM
  • श्रेयस अय्यरच्या एका पायाला अर्धांगवायू झाला होता आणि त्याला मज्जातंतूचा त्रास झाला होता.

  • पाठीवर शस्त्रक्रिया करून रॉड बसवण्यात आला असून अजूनही त्याला उपचार घ्यावे लागतात.

  • अय्यरने वेदनांना "भयानक आणि असह्य" असे वर्णन केले आहे, बीसीसीआयने त्याला २०२४-२५ च्या वार्षिक करारातून वगळले होते.

Shreyas Iyer reveals paralysis in one leg and nerve damage : भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर याची मुलाखत सध्या चांगली गाजतेय. आशिया चषक स्पर्धेत निवड न झाल्याने दुःख झाल्याचे त्याने कबुल केले होते, परंतु त्याचवेळी त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी करणारे खेळाडू संघात आहेत आणि त्यांना पाठिशी उभं राहण्याचे आवाहन त्याने केले होते. त्याचवेळी त्याला भारत अ संघाचे नेतृत्व देऊन बीसीसीआयने त्याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या दोन चारदिवसीय सामन्यांत तो नेतृत्व करणार आहे. अय्यरने मागील काही वर्षांत त्याच्या खेळात अविश्वसनीय बदल केला आहे आणि त्यामुळेच तो नेहमी चर्चेतही राहिला आहे.

आयसीसीचॅम्पियन्स ट्रॉफीत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा तो होता आणि त्यानंतर आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्सचे नेतृत्व करताना त्याने ६०० हून अधिक धावा केल्या. त्याने संघाला फायनलपर्यंत पोहोचवले. भारताच्या वन डे संघाचा तो सदस्य आहे, परंतु त्याला ट्वेंटी-२० संघातही संधी मिळाली, असे अनेकांना वाटते.

T20 World Cup 2026 Date: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची तारीख आली समोर, फायनल नरेंद्र मोदी स्टेडियमवर...१५ संघ पात्र, ५ जागा शिल्लक...

पण, अय्यरच्या कारकीर्दित चढ उतार पाहायला मिळाले आहेत. त्याला बीसीसीआयने २०२४-२५ च्या वार्षिक करारातून वगळले. बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट खेळणे सक्तिचे केले असतानाही तो खेळला नव्हता आणि तो त्याची तंदुरुस्ती सिद्ध करू शकला नव्हता. पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर त्याची २०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड झाली. ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्याची कारकीर्द धोक्यात आली असती. त्याच्या एका पायाला अर्धांगवायू झाला होता, मज्जातंतूला त्रास झाला होता आणि असह्य वेदना झाल्या होत्या.

'मी कोणत्या वेदनेतून गेलो होतो, हे कोणालाही समजणार नाही. एका पायाला अर्धांगवायू झाला होता. पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती आणि रॉड टाकला होता आणि अजूनही त्यावर उपचार घ्यावे लागतात. वेदना भयानक होती, माझ्या लहान पायाच्या बोटापर्यंत पसरली. ती खूप भयानक होती," असे अय्यरने GQ इंडियाशी बोलताना सांगितले.

Pritvi Shaw: पृथ्वी शॉ याला १०० रुपयांचा दंड; छेडछाड प्रकरणात सत्र न्यायालयाकडून कारवाई

दुखापतीतून सावरल्यानंतर अय्यर बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) पुनर्वसनासाठी दाखल झाला. त्यानंतर त्याची वन डे संघात निवड झाली. पण, त्याला अन्य फॉरमॅटमध्ये खेळवण्यात बीसीसीआय उत्सुक दिसत नाही. त्यावर अय्यर म्हणाला, ज्या गोष्टी माझ्या हाताबाहेर आहेत, त्याचा मी फार विचार करत नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.