पिंपरी चिंचवड : सकाळी व सायंकाळी चाकरमान्यांची वर्दळ अधिक असते. शिवाय अन्य वाहनांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने वाकड येथील भुजबळ चौक उडान पुलावरून जाण्यास दुचाकी वाहन चालकांना बंदी घालण्यात आली आहे. भुजबळ चौक उड्डाण पुलावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातून वाकड, हिंजवडीकडे जाण्यासाठी या पुलाचा वापर अधिक होत असतो. प्रामुख्याने सकाळी व सायंकाळी पुलावरून अधिक रहदारी असते. चाकरमाने ड्युटीवर जाण्यासाठी व घरी जाण्यासाठी दुचाकीने जात असतात. दरम्यान सर्वच वाहने या पुलावरून जात असल्याने सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असतो. हि वाहतूक कोंडी होऊ नये; यासाठी वाहतूक विभागाकडून दुचाकी चालकांना पुलावरून जाण्यास बंदी करण्यात आली आहे.
Chikhali Crime : चिखलीत दोन गटात राडा; शिबिरात रक्तदान केल्याच्या कारणावरून उफाडला वादवाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय
दर दिवशी भुजबळ चौक येथील उडान पुलावरून वाकड, पिंपळे सौदागर आणि हिंजवडीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहन चालक प्रवास करत असतात. त्यामुळे या उडान पुलावर वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात उद्भवते. हीच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हिंजवडी आणि वाकड वाहतूक विभागाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात दुचाकी चालकांना अन्य मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
Akkalkuwa : युरियाची टंचाई, पीक नुकसान भरपाईसाठी शेतकरी आक्रमक; तहसील कार्यालयासमोर आंदोलनदोन आठवड्यांसाठी बंदी
वाहतूक विभागाकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ वाजता या कालावधीत दुचाकी वाहन चालकांना उडान पुलावरून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुढील दोन आठवड्या पर्यंत ही बंदी असणार आहे अशी माहिती हिंजवडी वाकड वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आली.