-राजकुमार घाडगे
पंढरपूर : पंढरपूर बस आगाराला राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मागील महिन्यामध्ये ११ इलेक्ट्रिक शिवाई बस सुपूर्द करण्यात आल्या होत्या. या बस गाड्यांपैकी एकही ई-शिवाई बस पुणे ते पंढरपूर या मार्गावर सुरू करण्यात आली नव्हती. याबाबत `सकाळने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत महामंडळाने पुणे ते पंढरपूर या मार्गावर दररोज ११ ई- शिवाई बसच्या तब्बल २२ फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता सवलतींसह वातानुकूलित आरामदायी प्रवास अनुभवता येणार आहे.
Smart Meter: मीटरचा हिशोब ‘स्मार्ट’ की फसवा?; वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक संतप्त, दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात रांगामहाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर येथील बस आगाराला इलेक्ट्रिक शिवाई बस मिळाव्यात यासाठी येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने वारंवार पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यामुळे महामंडळाने मागील महिन्यामध्ये ११ ई शिवाई बस दिल्या होत्या. या बस गाड्यांपैकी काही गाड्या पंढरपूर ते पुणे या मार्गावर सुरू कराव्यात, अशी ग्राहक पंचायतीसह राज्यभरातील भाविक व स्थानिक प्रवाशांमधून देखील मोठी मागणी होती. तरी देखील पुणे येथील चार्जिंग स्टेशनच्या अनुपलब्धतेमुळे या मार्गावर एकही शिवाई बस सुरू करण्यात आली नव्हती.
याबाबत ‘सकाळ’ने १६ ऑगस्टच्या अंकामध्ये सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत चार्जिंग स्टेशनची उपलब्धता होताच महामंडळाने पुणे ते पंढरपूर या मार्गावर फलटणमार्गे शिवाई बसच्या दररोज तब्बल २२ फेऱ्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांबरोबरच स्थानिक प्रवाशांना देखील सर्व सवलतींसह आता शिवाई बसमधून वातानुकूलित आरामदायी प्रवास अनुभवता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.
पंढरपूर आगाराने पुणे ते पंढरपूर अशा फलटणमार्गे ई शिवाई बस सुरू केल्या आहेत. सुरक्षित प्रवासासह सवलतींसह मिळणाऱ्या या बससेवेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, यापैकी काही बस गाड्या पंढरपूर ते टेंभुर्णी ते इंदापूर ते पुणे या मार्गावर सुरू कराव्यात, अशीही आमची मागणी आहे. प्रवाशांसाठी ते अधिक सोयीचे होणार आहे.
- शशिकांत हरिदास, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत
Honesty Employee :'साईंच्या दरबारातील टोकाचा विरोधाभास'; कंत्राटी कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वच स्तरातून कौतुक शिवाई बसचे वेळापत्रकपंढरपूर ते पुणे पहाटे ६.००, ७.००, ८.००, ९.००, १०.००, ११.००, ०२.००, ०३.००, ०४.००, ०५.००, ०६.०० वाजता.
पुणे ते पंढरपूर पहाटे ६.००, ८.००, ९.००, १०.००, ११.००, ०३.००, ०४.००, ०५.००, ०.६००, ०८.००, ०९.०० वाजता बस धावणार आहेत.
पंढरपूर ते पुणे शिवाई बसचे तिकीट सवलतीचे दर
महिला प्रवासी व ज्येष्ठ नागरिक ः २९१ रुपये
अमृत योजना (७५ वर्षे पूर्ण) प्रवासी ः मोफत