पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत सहा हजार १६८ घरांसाठी सोडत म्हाडाच्या पुणे विभागाच्या वतीने गुरुवारी (ता. ११) जाहीर करण्यात आली. या घरांसाठी नागरिकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
Pune News : प्रभाग रचनेवर संताप; पुण्यात नागरिकांचा घोषणाबाजीचा धडाकाम्हाडाच्या पुणे कार्यालयात सोडत काढण्यात आली. या वेळी म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे उपस्थित होते. सोडतीमध्ये पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सदनिकांचा समावेश केला आहे. यंदा सोडतीच्या संगणक प्रणालीच्या पारदर्शकतेमध्ये आणखी भर घालण्यात आली आहे.
तसेच, अर्ज भरण्याच्या बाबींमध्ये काही बदल केला आहे, त्यानुसार अर्जदार, तसेच अर्जदाराच्या जोडीदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड हे ‘डीजी लॉकर’ वरूनच प्राप्त करून घेणे गरजेचे आहे. त्याकरिता अर्जदारास ‘डीजी लॉकर’वर नोंदणी करून आवश्यक माहिती अद्ययावत करावी लागणार असल्याचे आढळराव पाटील यांनी या वेळी सांगितले.
म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरीता अर्जदारांनी प्रथम www.housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी www.bookmayhome.mhada.gov.in तसेच lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन साकोरे यांनी केले.
सोडतीचे वेळापत्रक
ऑनलाइन अर्जासाठी नोंदणीची मुदत ३१ ऑक्टोबर
सोडतीसाठी अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध ११ नोव्हेंबर
दावे, हरकती दाखल करण्यासाठी अंतिम मुदत १३ नोव्हेंबर
सोडतीसाठी अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध १७ नोव्हेंबर
सोडत २१ नोव्हेंबर
अशी आहेत घरे
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील सदनिकांची संख्या १ हजार ६८३
म्हाडा ‘पीएमएवाय’ योजनेतील सदनिका २९९
१५ टक्के, २० टक्के योजनेतील सदनिकांची एकूण संख्या ४ हजार १८६
पुणे महापालिका हद्दीतील सदनिका १ हजार ५३८
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील सदनिका १ हजार ५३४
पीएमआरडीए हद्दीतील सदनिका १ हजार ११४