चिपळुणात ज्येष्ठांसाठी
चालण्याची स्पर्धा
चिपळूण ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने १७ सप्टेंबरला शहरातील नारायण तलाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी चालण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा सायंकाळी ४.३० वाजता सुरू होऊन ६.३० वाजता संपणार आहे. साठ वर्ष पूर्ण झालेले महिला व पुरुष यामध्ये सहभागी होऊ शकतील. ही स्पर्धा ६१ ते ६५ वर्षे, ६६ ते ७० तसेच ७१ ते ८० वयोगटातील महिला व पुरुष, अशा तीन गटात होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण त्याच दिवशी नारायण तलाव येथे होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी यांनी केले आहे.