देशात आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 10,971 रुपये प्रति ग्रॅम आहे. काल सकाळी सोन्याचा भाव 10984 रुपये प्रति ग्रॅम होता. तर बाजार बंद होताना हा भाव 10,970 रुपये इतका होता. म्हणजे सकाळी सोन्याच्या किंमती घसरलेल्या आहेत. तर त्या दुपारनंतर वधारलेल्या दिसतात. ही माहिती इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशननुसार आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 10,049 रुपये प्रति ग्रॅम होता. तर काल सकाळी ही किंमत 10,061 रुपये प्रति ग्रॅम इतकी होती.
चांदी 3 हजारांनी महाग
गेल्या आठवड्याच्या अखेरीस चांदी रेंगाळली होती. चांदीत पडझडही दिसली होती. तर या आठवड्याच्या अखेरीस चांदीने मोठी झेप घेतली आहे. काल दुपारनंतर चांदी 2100 रुपयांनी महागली. तर आज सकाळच्या सत्रात चांदीने हजाराचा झेंडा फडकवला आहे. म्हणजे दोन दिवसात चांदी 3100 रुपयांनी महागली आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,33,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदीचा भाव घसरला आहे.. 24 कॅरेट सोने 1,09,710 रुपये, 23 कॅरेट 1,09,270, 22 कॅरेट सोने 1,00,490 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 82,280 रुपये, 14 कॅरेट सोने 64,180 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,28,008रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
शुद्ध सोन्याची ओळख अशी करा
सोन्याच्या दागिन्याची शुद्धता ओळखण्याची एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमार्कशी संबंधित अनेक चिन्हे दिसून येतात. या चिन्हांमुळे सोन्याची गुणवत्ता सिद्ध होते. सोने कोणत्या कॅरेटचे आहे ते दिसून येते. सोन्यामध्ये एक कॅरेटपासून ते 24 कॅरेटपर्यंतची तफावत असते. सोन्याचे दागिने तयार करण्यसाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर होतो. ज्वेलरी वर हॉलमार्क लावणे, चिन्हांकित करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 24 कॅरेट सोने शुद्ध मानण्यात येते. त्यावर 999 अंक चिन्हांकित असते. या सोन्यापासून दागिने तयार करण्यात येत नाही. 22 कॅरेट चे दागिने असतील तर त्यावर 916 अंक चिन्हांकित असतो. 21 कॅरेटचे दागिने असतील तर त्यावर 875 हा अंक चिन्हांकित करण्यात येतो. 18 कॅरेटच्या ज्वेलरीवर 750 अंक असतो. तर 14 कॅरेटच्या दागिन्यावर 585 अंक असतो.