जायकवाडी (ता. पैठण) : नाथसागर धरण परिसरात रविवारी (ता. १४) पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत अचानक मोठी वाढ झाली. यामुळे पाटबंधारे विभागाने तातडीने टप्प्याटप्प्याने दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रात विसर्ग वाढवला.
रात्री अडीचपर्यंत धरणाचे १० ते २७ असे १८ दरवाजे तीन फूट उंचीवर स्थिर करण्यात आले. त्यातून सुरू असलेल्या ४७ हजार १६० क्युसेक विसर्गामध्ये टप्प्याटप्याने वाढ करून तो ७५ हजार ४५६ क्युसेकपर्यंत नेण्यात आला.
त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आपत्कालीन १ ते ९ दरवाजे उघडण्यात आले. याद्वारे ४ हजार ७१६ क्युसेक वाढवून विसर्ग ८० हजार १७२ क्युसेकवर स्थिर झाला. दरम्यान, रविवारी सकाळपर्यंत दरवाजे साडेचार फुटांपर्यंत उघडण्यात आल्याने विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.अखेरीस नदीपात्रात तब्बल १ लाख १३ हजार १८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. यामुळे गोदावरी काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पर्यटकांमुळे वाहतूक कोंडीसध्या धरणातील विसर्गाचा आनंद घेण्याकरिता छत्रपती संभाजीनगरसह विविध जिल्ह्यांतील पर्यटक धरणस्थळी गर्दी करीत आहेत. त्यामुळे रविवारी वाहनांच्या १ ते २ किलोमीटर रांगा लागल्या आहेत. त्यामुळे धरण परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. याकडे पैठण पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.
Nashik News : नाशिकच्या पंचवटी-राज्यराणीसाठी खासदार वाजे लोकसभेत; रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसादजायकवाडी धरणामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असून पूरस्थिती नियंत्रणात आहे. हवामान खात्याने रविवारपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे जायकवाडी प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
- प्रशांत संत, कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग, पैठण
सध्या जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गोदावरी नदीकाठावर असलेल्या गावांमध्ये तहसील प्रशासनातर्फे दवंडी देऊन जीवितहानी व आपल्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये, म्हणून सूचना करण्यात आल्या आहेत.
- ज्योती पवार, तहसीलदार पैठण