डोनाल्ड ट्रम्प यांना नडने पडले महागात, तब्बल 1.321 लाख कोटींचा मानहानीचा दावा, जगात खळबळ
GH News September 16, 2025 04:17 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चांगलेच संतापल्याचे बघायला मिळतंय. त्यांनी थेट आपला संताप व्यक्त करत मोठा झटका दिला. मागील काही दिवसांपासून टॅरिफच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यामध्येच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत थेट अमेरिकन वृत्तपत्र द न्यू यॉर्क टाईम्स (NYT) विरोधात खटला दाखल केल्याची माहिती दिली. हा खटला असा तसा नसून तब्बल 15 अब्ज डॉलर्स अर्थात 1.321 लाख कोटींचा आहे. द न्यू यॉर्क टाईम्सविरोधात डोनाल्ड ट्रम्प हे मानहानीची दावा केला आहे. यासोबतच त्यांनी काही गंभीर आरोपही केली आहेत.

अनेक वर्षांपासून आपल्याविरोधात खोटी मोहीम द न्यू यॉर्क टाईम्सने सुरू केल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मी आज द न्यू यॉर्क टाईम्सविरुद्ध 15 अब्ज डॉलर्सचा मानहानीचा खटला दाखल केला.  अमेरिकेतील सर्वात वाईट हे वृत्तपत्र आहे, जे आता रॅडिकल डेमोक्रॅट पक्षाचे मुखपत्र बनले आहे. न्यू यॉर्क टाइम्स माझ्याविरुद्धच फक्त नाही तर माझ्या कुटुंबाविरुद्ध, माझ्या व्यवसायांविरुद्ध, राजकारणाविरुद्ध खोट्या असंख्य बातम्या पसरवत आहे.

ही पहिली वेळ नाही की, डोनाल्ड ट्रम्प यांनी द न्यू यॉर्क टाईम्सवर अशाप्रकारचा आरोप केला. यापूर्वीही अनेकदा डोनाल्ड ट्रम्प हे  द न्यू यॉर्क टाईम्सवर अशाप्रकारचे आरोप करताना दिसले आहेत. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ABC, NYT, Disney, 60 Minutes सारख्या अनेक वृत्तसंस्थांवर खोट्या आणि चुकीच्या बातम्या दाखवल्याचा आरोप केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या पोस्टनंतर चांगलीच खळबळ उडाली.

आता तर त्यांनी थेट द न्यू यॉर्क टाईम्सविरोधात मानहानीचा मोठा खटका दाखल केला. टॅरिफटा मुद्दा असेल किंवा H1B व्हिसाचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली जात आहे. सततच्या टीकेला वैतागून डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधातील बातम्या रोखण्यासाठी मानहानीचा दावा दाखल केला. भारतासह अनेक मोठ्या देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.