India Largest Gold Market : भारतासह जगातील सर्व देशांमध्ये सोने हा सर्वात मौल्यवान धातूंपैकी एक आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला नेहमीच मागणी राहिली आहे. भारत दरवर्षी इतर देशांमधून मोठ्या प्रमाणात सोने आयात करतो. सोन्याचा वापर अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये केला जातो. त्यापासून दागिने बनवले जातात. पण तुम्हाला भारतातील सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ कुठे आहे? जिथून देशभर सोने पुरवले जाते, याबाबतची माहिती आहे का? तिथे सोने स्वस्च मिळते का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
देशातील सर्वात मोठी सराफा बाजारपेठ कुठे आहे?
जळगाव आणि रतलाम या ठिकाणी देखील सोन्याचे मोठे बाजार आहेत. या सोन्याच्या प्रसिद्ध बाजरपेठा आहेत, परंतु त्या सर्वात मोठ्या सोन्याच्या बाजारपेठा नाहीत. देशातील सर्वात मोठी सराफा बाजारपेठ मुंबईतील झवेरी येथे आहे. याशिवाय, केरळमधील त्रिशूर शहर ‘भारताची सोन्याची राजधानी’ म्हणून ओळखले जाते.
झवेरी बाजार कधी आणि कोणी बांधला?
भारताची आर्थिक राजधानी मुंबई स्थित झवेरी बाजार हा भारतातील सर्वात मोठा सोन्याचा बाजार मानला जातो. याला संपूर्ण आशियातील सर्वात मोठा सोन्याचा बाजार देखील म्हटले जाते. मुंबईचा झवेरी बाजार 160 वर्षांहून अधिक जुना आहे. 1864 मध्ये प्रसिद्ध सराफा व्यापारी त्रिभुवनदास झवेरी यांनी याची सुरुवात केली होती. म्हणूनच त्याला झवेरी बाजार म्हणून ओळखले जाते.
झवेरीमध्ये सोने स्वस्तात मिळते का?
झवेरी बाजार देशाच्या जवळजवळ प्रत्येक कानाकोपऱ्यात सोन्याचे दागिने पुरवतो. येथे बनवलेले दागिने चांगल्या दर्जाचे आणि उत्तम डिझाइनचे असतात. येथे हिऱ्यांचाही व्यापार केला जातो. सहसा झवेरी बाजारात मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी केल्या जातात. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात खरेदीमुळे किंमत देखील कमी होते, परंतु किरकोळ खरेदीसाठी अशी कोणतीही सवलत नसते. ती बाजारभावांवर आधारित असते.
त्रिशूरला ‘सोन्याची राजधानी’ असंका म्हटले जाते?
केरळच्या त्रिशूरला देशाची ‘सोन्याची राजधानी’ का म्हटले जाते कारण हे शहर सोन्याच्या व्यापार आणि दागिन्यांच्या निर्मितीसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. त्रिशूरमध्ये अनेक कारखाने आणि कारागीर आहेत, जे मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने बनवतात. दक्षिण भारतातील सोन्याच्या व्यापाराचे हे एक प्रमुख केंद्र आहे. याशिवाय, भारतातील इतर महत्त्वाच्या सोन्याच्या बाजारपेठांमध्ये महाराष्ट्रC. जळगावमध्य प्रदेशातील रतलाम आणि दिल्लीतील सराफा बाजार यांचा समावेश आहे.
आणखी वाचा