NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?
esakal September 16, 2025 08:45 PM

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस औपचारिक उद्घाटनासाठी सज्ज असलेले एनएमआयए मुंबईच्या गगनरेषेला तसेच विमान वाहतुकीच्या भवितव्याला नवीन आकार देणार आहे. प्रवासीकेंद्री जोड विमानतळ प्रारूप, अत्याधुनिक टर्मिनल्स आणि वैश्विक स्तरावरील सुविधा यांच्या माध्यमातून हे विमानतळ क्षमता, सोय आणि कनेक्टिविटी यांचे नवीन मापदंड स्थापन करणार आहे. तसेच दुबई, लंडन आणि न्यूयॉर्क या जगातील सर्वोत्तम विमानतळांच्या तोडीचे ठरणार आहे.

नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी, उलवे आणि पनवेल यांच्या जवळ, तयार झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (एनएमआयए) सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या उद्घाटनानंतर भारताची आर्थिक राजधानी मुंबई विमान वाहतुकीच्या एका नवीन युगात प्रवेश करत आहे. दुबई (डीएक्सबी-डीडब्ल्यूसी), लंडन (हीथ्रॉ-गॅटविक) आणि न्यूयॉर्क (जेकेएफ-नेवार्क) अशा विमानतळांच्या जोड्यांद्वारे वाहतूक करणाऱ्या शहरांच्या समूहात प्रवेश करण्यास आता मुंबईही सज्ज आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी ५० लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करून मुंबईला भारतातील तसेच जगातील अन्य शहरांशी जोडण्याचे काम क्षमतेच्या मर्यादेसह करत आला आहे. विस्तारासाठी मर्यादित जागा आणि संपृक्तता च्या नजीक पोहोचलेली एकेरी धावपट्टी बघता मुंबईला आणखी एका आंतरराष्ट्रीय विमानतळाची तातडीने आवश्यकता होती. एनएमआयए या समस्येवरील तोडगा आहे. जगात इतरत्र अवलंबण्यात आलेले धोरणच येथेही राबवण्यात आले आहे.

Mumbai News: जुन्या वाहनांवर ‘मामा’, ‘दादा’ क्रमांक! मुंबईत ६५ चालकांना दंड

वाहतुकीचे दोन आस्थापनांमध्ये विभाजन करून वाहतुकीची कोंडी मोकळी करणे, कामकाजातील धोका कमी करणे आणि प्रवाशांना विमान कंपन्या व मार्ग यांचे अधिक पर्याय पुरवणे. रस्ते, मेट्रो, उपनगरीय रेल्वेव जलमार्ग अशा बहुमार्गीय साधनांद्वारे एनएमआयए व सीएसएमआयए अखंडितपणे जोडलेले राहतील आणि भारतातील सर्वांत व्यग्र व्यावसायिक शहरातही जगातील मोठमोठ्या राजधान्यांच्या तोडीच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होतील.

टर्मिनल्स, पायाभूत सुविधा व प्रारंभिक सेवा

एनएमआयएच्या पहिल्या टप्प्यात टर्मिनल वन सुरू केले जाणार आहे. वर्षाला २० दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करण्याच्या दृष्टीने टर्मिनल वन बांधण्यात आले आहे, यांत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही सेवांचा समावेश आहे. टर्मिनल वनची रचना कमळाच्या फुलापासून प्रेरित आहे, यात एक भव्य छत बांधले गेले आहे. नैसर्गिक प्रकाश मुबलक येईल अशा शाश्वत बांधकाम पद्धतींचा अवलंब करण्यात आला आहे. टर्मिनल वनचे स्थापत्य म्हणजे सांस्कृतिक ओळख व आधुनिक महत्त्वाकांक्षा यांचा प्रतिकात्मक संयोग आहे.

टर्मिनलच्या आतमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा

स्वयंचलित किऑस्क आणि बायोमेट्रिक पडताळणीने सुसज्ज असा अत्याधुनिक चेक- इन झोन. सामान ताब्यात घेण्याच्या जागतिक दर्जाच्या प्रणाली, या प्रणाली जगभरातील सर्वोत्तम असल्याचा दावा केला जात आहे. प्रशस्त प्रतीक्षा स्थळे (वेटिंग लाउंजेस) आणि एकेरी रांगेचे मार्ग व प्रगत स्कॅनिंग असलेल्या स्मार्ट सिक्युरिटी लाइन्स

दशकानुदशकं टिकणारे रस्ते आता एका पावसातच कोसळतात, उच्च न्यायालयाचे बीएमसीवर ताशेरे, काय सांगितलं? ९० लाख प्रवाशांची क्षमता

व्यापक आराखड्यात चार टर्मिनल्सची योजना आहे, हा आराखडा २०३२ सालापर्यंत प्रत्यक्षात येणार आहे, या सर्व टर्मिनल्सवरून दरवर्षी ९० लाख प्रवाशांची वाहतूक होऊ शकेल. या आस्थापनांमध्ये लवचिक फाटक व्यवस्थापन, स्वयंचलित बोर्डिंग, डिजिटल प्रक्रिया यांचा समावेश असेल, त्यामुळे प्रचंड गर्दीच्या काळातही प्रवास सुरळीतपणे होऊ शकेल. टर्मिनल्सच्या पलीकडे एनएमआयएमध्ये एकात्मिक एअरो सिटी स्थापन केली जाणार आहे. यांत रिटेल, हॉस्पिटॅलिटी व लॉजिस्टिक्स हब्जचा अंतर्भाव असल्याने विमानतळाचे रूपांतर एका स्वयंपूर्ण आर्थिक परिसंस्थेत होणार आहे.

प्रवासी, माल आणि विमान वाहतूक परिसंस्था

हा विमानतळ प्रवासी केंद्र होणार आहे. टर्मिनलच्या अंतर्गत रचनेत खुलेपणावर भर देण्यात आला आहे. प्रवाशांना सहज मार्ग सापडतील अशी रचना आहे, ठिकठिकाणी कलाकृती लावलेल्या आहेत आणि हिरवाईही राखण्यात आली आहे. लाउंजेस वेगवेगळ्या स्तरावर बांधल्यामुळे धावपट्टी दृष्टीपथात राहू शकेल. डायनिंग कोर्टमध्ये मुंबईतील प्रसिद्ध स्ट्रीट फूडसोबतच आंतरराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीतील पदार्थही उपलब्ध असतील. रिटेल दुकानांमध्ये लग्झरी ब्रॅण्ड्स आणि खास विकसित करण्यात आलेल्या स्थानिक दुकानाचे संयोजन असेल. त्यातून भारतीय वैशिष्ट्यांसह वैश्विक वातावरण निर्माण होईल.

मोफत वाय-फाय, फॅमिली लाउंजेस, बिझनेस पॉड्स आणि डिजिटल नेव्हिगेशन साधने यांसारख्या सुविधा व्यावसायिक प्रवासी, पर्यटक आणि अगदी प्रथमच विमान प्रवास करणाऱ्यांपर्यंत प्रत्येकाचा विचार करून आखण्यात आल्या आहेत. अर्थात एनएमआयए हे केवळ प्रवाशांचे केंद्र नाही. ते मालवाहतुकीचे पॉवरहाउस म्हणूनही विकसित केले जात आहे. मालवाहतुकीची सुरुवात वर्षाला ८ लाख टन क्षमतेसह होईल, पुढे ही क्षमता अनेक पटींनी वाढवण्याची योजना आहे. मुंबईतील औषधनिर्माण उद्योग, नाशवंत माल तसेच ई-कॉमर्स पुरवठा साखळ्यांसाठी एनएमआयए महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Doctors Strike: डॉक्टर संघटनेची संपाची हाक, १२ तास खासगी रुग्णालयांसह क्लिनिक बंद; नेमकं कारण काय?

एनएमआयएचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर कॉर्पोरेट प्रवासासाठी भारतातील सर्वांत मोठा सामान्य विमान प्रवास टर्मिनल येथे होणार आहे. यांत सुमारे ७५ बिझनेस जेट स्टॅण्ड्स तसेच नियोजित व अनियोजित उड्डाणांसाठी हेलिपोर्टचा समावेश असेल. याशिवाय, इंधन केंद्र, अतिप्रगत देखभाल (मेण्टेनन्स) आस्थापने, अत्याधुनिक एटीसी टॉवर (हवाई वाहतूक नियंत्रण मनोरा सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपात असेल आणि सात वर्षांमध्ये कायमस्वरूपी बांधला जाईल) यांचा अंतर्भाव विमानतळाच्या रचनेत आहे. एनएमआयएच्या रचनेत प्रत्येक स्तरावर कार्यक्षमता, सुरक्षितता तसेच भविष्यकालीन नियोजन यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

जागतिक केंद्रांच्या तुलनेत मुंबईचे स्थान

एनएमआयए-सीएसएमआयए जोड विमानतळामुळे मुंबईला जगातील अत्याधुनिक बहुविमानतळ प्रणालींमध्ये स्थान प्राप्त झाले आहे. आकडेवारीनुसार, दुबई इंटरनॅशनलची (डीएक्सबी) क्षमता आधीच वार्षिक ९० लाखांहून अधिक झालेली आहे, एआयच्या मदतीने मॅकटाउम इंटरनॅशनलची क्षमताही १ कोटी २० लाखांचा आकडा पार करणार आहे. लंडनमधील हीथ्रो, गॅटविक, स्टॅनस्टेड आणि ल्युटन विमानतळ नेटवर्क दरवर्षी १ कोटी ८० लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करते. तर न्यूयॉर्कमध्ये जेकेएफ, नेवार्क आणि लागार्डिया विमानतळ मिळून सुमारे १ कोटी ३० लाख प्रवासी संख्या दरवर्षी हाताळतात.

२०३२ सालापर्यंत एनएमएआयची क्षमता सीएसएमआयएवरील अतिरिक्त भारासह ९० लाखांपर्यंत जाईल. मुंबईला १ कोटी ५० ते ६० लाख प्रवाशांची वाहतूक दरवर्षी करता येईल. यामुळे मुंबई जागतिक मापदंडाच्या स्पर्धेत उभी राहू शकेल. महत्त्वाचे म्हणजे या धोरणामुळे विमान वाहतुकीची क्षमता पूर्णपणे वापरली जाईल, शिवाय याचा आर्थिक परिणाम बराच व्यापक असेल. नवी मुंबई परिसरात नोकऱ्या, पर्यटन, कॉर्पोरेट गुंतवणूका आणि रिअल इस्टेट सर्वच क्षेत्रांमध्ये वाढ होईल.

विमान कंपन्या नवीन विमानतळाला सकारात्मक प्रतिसाद देतील असे अपेक्षित आहे. इंडिगो आणि अकासा एअर या देशांतर्गत या विमान कंपन्यांनी नवीन विमानतळावरून वाहतूक करण्याची हमी दिली आहे, तर आघाडीच्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कंपन्या भारतातील विमान वाहतुकीतील अवाढव्य वाढीकडे तसेच तंत्रज्ञानकेंद्री विमानतळावरील प्रगत सुविधांकडे आकर्षित होऊ शकतात. या दोन्हींचा मिलाफ झाल्यास भारतातील खरेखुरे जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून मुंबईचे स्थान भक्कम होऊ शकते.

Sanjay Raut : भारत-पाक सामन्यामुळे पाकिस्तानला मिळाले हजार कोटी रुपये? संजय राऊत म्हणतात दीड लाख कोटींचा जुगार... उड्डाणासाठी सज्ज

लवकर सुरू होणारे एनएमआयए फक्त दुसऱ्या रनवेबद्दल नाही. हा भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी विमानतळ प्रकल्प आहे, जो दशकापासूनच्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी डिझाइन करण्यात आला असून देशाच्या पायाभूत सुविधेसंदर्भातील महत्त्वाकांक्षांना सादर करतो. हे विमानतळ प्रवाशांना जलद, स्मार्ट आणि अधिक आरामदायी प्रवास देईल. व्यवसायांसाठी ते कनेक्टिव्हिटी आणि विकासाचे नवीन कॉरिडॉर उघडते. आणि मुंबईसाठी, ते दुबई, लंडन आणि न्यूयॉर्क यांच्या बरोबरीने जगातील मोठी दुहेरी-विमानतळ सिस्टम म्हणून स्थान सुनिश्चित करते.

विमानतळाचे उद्घाटन करण्याचे काऊंटडाऊन सुरू झाले असताना एनएमआयए उड्डाण सेवा देण्यास सज्ज आहे, ज्यासह भारतातील विमान वाहतूक क्षेत्रासाठी नवीन अध्यायाची सुरूवात करेल आणि कार्यसंचालन वाढ, शाश्वतता व प्रवासी आनंदाचे नवीन मानक स्थापित करेल.

मोठी गुंतवणूक

गुंतवणूक रक्कम: १६ हजार कोटी रूपयांहून अधिक

डेटा

विमानतळ क्षमता टाइमलाइन

• फेज १ व २ - टर्मिनल १ - २० एमपीपीए

• फेज ३ - टर्मिनल २ - ३० एमपीपीए (एकूण ५० एमपीपीए)

• फेज ४ - टर्मिनल ३ - २० एमपीपीए (एकूण ७० एमपीपीए)

• फेज ५ - टर्मिनल ४ - २० एमपीपीए (एकूण ९० एमपीपीए)

स्रोत: एएएचएल

एनएमआयएची ठळक वैशिष्ट्ये

• २०३२ पर्यंत चार प्रवासी टर्मिनलची योजना.

• दोन समांतर रनवे; पूर्ण क्षमतेने प्रति तास ४५ एटीएम (एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट)

• सुरुवातीच्या कामकाजात जगातील सर्वात गतीशील बॅगेज क्लेम सिस्टम.

• जनरल एव्हिएशन टर्मिनल: भारतातील सर्वात मोठे, अंदाजे ७५ विमान स्टँडसह

• कार्गो टर्मिनल: पहिल्या टप्प्यात ०.८ दशलक्ष टन/वर्ष (३३,००० चौरस मीटर - देशांतर्गत आणि २३,७०० चौरस मीटर आंतरराष्ट्रीय).

• समर्पित एमआरओ सुविधा आणि प्रगत एटीसी टॉवर.

• नियोजित कनेक्टिव्हिटी: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, आगामी मेट्रो लाइन्स, सर्व प्रमुख महामार्गापासून जवळच्या अंतरावर.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.