यंदा नवरात्री २२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
हिंदू धर्मात नवरात्रीला खुप महत्व आहे.
नवरात्रीत सुखसमृद्धी लाभण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या हे जाणून घेऊया.
शारदीय नवरात्रीपूर्वी घर पूर्णपणे स्वच्छ करणे खूप महत्वाचे मानले जाते.
कलशाची जागाशारदीय नवरात्रीत कलश योग्य दिशेला बसवा.
जर तुमच्या घरात वेगळी पूजा खोली असेल तर त्याच्या दिशेकडे विशेष लक्ष द्या.
नवरात्रीत तुपाचा दिवा लावणे शुभ असते. तुम्ही तो घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा आग्नेय कोपऱ्यात लावू शकता.
वास्तुशास्त्रानुसार, घराचा मुख्य दरवाजा हा सर्वात जास्त ऊर्जा देणारा ठिकाण आहे. नवरात्रीच्या वेळी, तो आंब्याच्या पानांनी आणि झेंडूच्या फुलांनी बनवलेल्या तोरणाने सजवावा.