पुणे, ता. १५ : फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग एंटरप्रेनियर्स (फेम) तर्फे राष्ट्रीय जाहिरात दिनाचे औचित्य साधून यंदा भव्य आर्ट वर्क स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाची संकल्पना ‘स्वदेशी खरेदी करा- आत्मनिर्भर भारत घडवा’ अशी जाहीर करण्यात आली आहे.
या स्पर्धेत ‘फेम’च्या सर्व सदस्य एजन्सींबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थी व नवोदित कलाकारांना सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेचा विषय ‘स्वदेशी खरेदी’ (बाय इंडियन, बिल्ड नेशन) हा असून आर्ट वर्कचे सादरीकरण १६x१५ सेंटिमीटर आकारात डिजिटल स्वरूपात (पीडीएफ, इलस्ट्रेटर फ्री फाइल) पाठवणे आवश्यक आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. इच्छुकांनी आपली आर्ट वर्क्स १० ऑक्टोबरपर्यंत federation.fame@gmail.com या मेलवर पाठवावीत. प्रथम क्रमांकाचे आर्ट वर्क राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. विजेत्यांची निवड विशेष आर्टिस्ट समितीद्वारे केली जाईल व समितीचा निर्णय अंतिम राहील.
- बक्षिसे :
- प्रथम : ११ हजार रुपये रोख व सन्मानपत्र
- द्वितीय : ५ हजार रुपये रोख व सन्मानपत्र
- तृतीय : ३ हजार रुपये रोख व सन्मानपत्र
देशाच्या प्रगतीसाठी स्वदेशी खरेदीला चालना मिळणे गरजेचे आहे. युवक व नवोदित कलाकारांनी आपल्या कल्पनाशक्तीतून व सर्जनशीलतेतून या संदेशाला प्रभावीपणे जनमानसात पोहोचवावे, हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
- रवी पवार, अध्यक्ष- ‘फेम’