Nandurbar : बनावट कागदपत्रांचा आधारे मंजूर नसलेल्या पदावर नियुक्ती; नंदुरबार शिक्षण विभागाचा बोगस कारभार
Saam TV September 17, 2025 12:45 AM

सागर निकवाडे 

नंदुरबार : शिक्षण विभागातील भोंगळ कारभार कायम समोर येत असतो. शिक्षण विभागातील अनेक बोगस प्रकरण समोर येत असताना नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विभागाचा बोगस कारभार समोर आलेला आहे. यामध्ये बनावट कागपत्रांच्या आधारे रिक्त आणि मंजूर नसलेल्या पदावर नियुक्ती देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  

नंदुरबारजिल्हा परिषद शिक्षण विभागाचा हा अनागोंदी कारभार समोर आला आहे. यामध्ये शहादा तालुक्यातील एका संस्थेत बनावट कागदपत्रांच्या आधारे शाळेत रिक्त आणि मंजूर नसलेल्या शिपाई पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी अनुकंप धारकाची बोगस नियुक्ती करून नसलेल्या पदावर थेट अनुकंप धारक सागर इंगळे यांना नियुक्ती दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्थात अनुकंप धारकाची फसवणूककरण्यात आल्याचा प्रकार झाला आहे. 

Jalgaon Crime : दोन कुटुंबात जुना वाद उफाळला; हाणामारीत एकाच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

चार वर्षांपासून नियुक्ती 

गेल्या चार वर्षांपासून अनुकंप धारकाची फसवणूक केल्याचा हा प्रकार असून अनुकंप धारक सागर इंगळे मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थात या प्रकारातून अनुकंप धारकाला नियुक्ती देण्यात आल्याचे दाखविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ज्या शाळेत नियुक्ती करण्यात आली; त्या ठिकाणी जागा रिक्त नव्हती किंवा पद मंजूर देखील नसल्याचा प्रकार समोर आला. यामुळे अनुकंप धारक सागर इंगळे यांची एकप्रकारे फसवणूक झाली आहे.  

Gadchiroli : स्मशानभूमीच्या जागेवरून वाद; दोन गटांत तुंबळ हाणामारी, गावात तणावाचे वातावरण

न्यायासाठी कुटुंब बसले उपोषणाला 

अखेर अनुकंप धारक वारंवार यासंदर्भातील तक्रार करूनही संबंधित विभागाने लक्ष न दिल्याने परिवारासोबत उपोषण करण्याची वेळ अनुकंपधारकावर आली आहे. जोपर्यंत संपूर्ण बोगस कारभाराचा पर्दाफाश होऊन संस्थेवर कार्यवाही होत नाही, न्याय मिळत नाही; तोपर्यंत संपूर्ण परिवारासोबत बेमुदत उपोषण करणार असल्याचा पवित्र अनुकंप धारक सागर इंगळे यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.