नाशिक: मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनानंतर ‘हैदराबाद गॅझेट’ लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. पण, कुणाला किती आरक्षण मिळाले, कुणाला प्रमाणपत्र मिळणार, हे मला कुणीतरी समजून सांगावे, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात रविवारी (ता. १४) त्या बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या, की समाजात वाढत चाललेली कटुता थांबली पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, की सर्वपक्षीय बैठक बोलवा किंवा पाच दिवसांचे अधिवेशन बोलवा. यावर चर्चा करा अशी मागणी केल्याचे सांगितले.
पक्ष कार्यकर्त्यामागे पक्ष ताकदीने उभे राहील. गलिच्छ राजकारणाचा निषेध आहे. कार्यकर्त्यांनी कुणाच्या कुटुंबापर्यंत जायचे नाही, ही आपली संस्कृती नाही. राज्यात कुणीही चुकीची कामे करीत असेल तर ताकदीने उतरावे लागेल. आता बस्स झाले. सर्व युवकांनी विरोधक म्हणून प्रश्न मांडले पाहिजेत.
Gaus Shirolkar: शेतकऱ्यांना विविध शासकीय अनुदान द्या: प्रदेश सरचिटणीस गौस शिरोळकर; कृषिमंत्री, अल्पसंख्याक, क्रीडामंत्र्यांची घेतली भेटसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. सत्ताधाऱ्यांमध्ये रुसवेफुगवे सुरू असून, ते सामान्यांच्या कामाचे नाहीत. आपला पक्ष दमदाटीने चालत नाही, असे सांगत सुळे यांनी अप्रत्यक्ष अजित पवार यांना टोला लगावला. पक्ष सोडून गेले असले, तरी नवीन नेतृत्व तयार होणार आहे. पक्षाने ताकदीने उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.