Maldhok Sanctuary: निसर्गप्रेमींनो, माळढोक अभयारण्य फिरायला जायचं? मग जाणून घ्या प्रवेश शुल्क आणि भेटीची योग्य वेळ!
esakal September 17, 2025 08:45 AM

थोडक्यात:

  • सततच्या पावसामुळे माळढोक अभयारण्यात निळसर हिरवळीचा मनमोहक नजारा दिसतो.

  • अभयारण्य सकाळी 6 वाजता उघडते आणि संध्याकाळी 6 वाजता बंद होते, प्रवेश फी ८० रुपये आहे.

  • माळढोक अभयारण्य सोलापूरपासून २२ किलोमीटर अंतरावर नान्नज गावाजवळ आहे.

  • Maldhok Wildlife Sanctuary: सततच्या पावसामुळे माळढोक अभयारण्य निळसर हिरवळीने सजले आहे. पावसाने परिसरात भरभरून हिरवळ पसरली असून, निसर्गप्रेमींना आणि पर्यटकांना या ठिकाणी येण्याची संधी देत आहे.

    माळढोक अभयारण्य हा भारतीय माळढोक (ग्रेट इंडियन बस्टर्ड) यांसारख्या दुर्मिळ पक्ष्यांच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय येथे हरिण, काळवीट, ससे, कोल्हे, लांडगे आणि खोकड यांसारख्या प्राण्यांसह अनेक पक्षीही पाहायला मिळतात.

    Udupi Weekend Trip: उडपीला फिरायला जायचं प्लॅन आहे का? मग हे ठिकाणं नक्की एक्सप्लोर करा!

    जर तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायला आणि अभयारण्यातील सौंदर्य अनुभवायला इच्छुक असाल, तर येथे भेट देण्यासाठी योग्य वेळ आणि काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

    भेटीची योग्य वेळ

    माळढोक अभयारण्य सकाळी 6 वाजता उघडते आणि संध्याकाळी 6 वाजता बंद होते. त्यामुळे सकाळी लवकर येणे अधिक चांगले ठरेल कारण सकाळच्या थंड हवामानात निसर्ग पाहण्याचा आनंद द्विगुणित होतो.

    प्रवेश शुल्क

    व्यक्तीला 80 रुपये प्रवेश फी आहे.

    कॅमेरा घेऊन जाण्यासाठी 500 रुपये अतिरिक्त शुल्क लागू आहे.

    चारचाकी वाहनासाठी 150 रुपये (शंभर हेक्टरपर्यंत) फी आहे.

    Monsoon Diseases: अतिवृष्टीमुळे साथीच्या आजारांचा धोका वाढतोय; तज्ज्ञांनी केले आवाहन कसे पोहोचाल?

    माळढोक अभयारण्य हे सोलापूर-बार्शी मार्गावर नान्नज गावाजवळ आहे. सोलापूरपासून हे ठिकाण सुमारे २२ किलोमीटर अंतरावर आहे. नान्नज-मार्डी रस्त्याने एक किलोमीटर चालल्यावर अभयारण्यात पोहोचता येते.

    FAQs

    1. माळढोक अभयारण्यात प्रवेश शुल्क किती आहे? (What is the entry fee for Maldhok Sanctuary?)

    माळढोक अभयारण्यात व्यक्तीसाठी ८० रुपये प्रवेश शुल्क आहे.

    2. माळढोक अभयारण्यात भेट देण्याची योग्य वेळ कोणती आहे? (What is the best time to visit Maldhok Sanctuary?)

    सकाळी ६ वाजता ते संध्याकाळी ६ वाजता पर्यंत अभयारण्य खुलं असतं, त्यामुळे सकाळी लवकर भेट देणं चांगलं.

    3. माळढोक अभयारण्य कसं पोहोचायचं? (How to reach Maldhok Sanctuary?)

    माळढोक अभयारण्य सोलापूर-बार्शी मार्गावर नान्नज गावाजवळ असून, सोलापूरपासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर आहे.

    4. कॅमेरा घेऊन जाण्यासाठी कोणते अतिरिक्त शुल्क आहे का? (Is there an additional fee for carrying a camera?)

    होय, कॅमेरा घेऊन जाण्यासाठी ५०० रुपये अतिरिक्त शुल्क आहे.

    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.