Beed–Ahilyanagar Train: बीड ते अहिल्यानगरच्या रेल्वेचं प्रवास भाडे किती? रेल्वे मार्गावर एकूण स्टेशन किती?
Saam TV September 18, 2025 10:45 AM
  • बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच रेल्वे धावली.

  • १६७ किमी अंतराचा हा प्रवास असून अनेक स्टेशनांचा समावेश आहे.

  • बीडकरांसाठी ही ऐतिहासिक आणि सोयीची रेल्वे सेवा ठरणार आहे.

बीडकरांसाठी ऐतिहासिक घटना घडलीय. बीड-अहिल्यानगर रेल्वेमार्गावर बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गावर आज पहिल्यांदा रेल्वे धावली. मंत्री महोदयांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रेल्वेने आपला प्रवास सुरू केला. बीड-अहिल्यानगर-परळी मार्गावर ही रेल्वे धावणार आहे. पहिल्या टप्प्यात आज बीड ते अहिल्यानगर या १६७ किमी मार्गावर रेस्वे धावेल. बीड ते अहिल्यानगरच्या प्रवासासाठी किती भाडे असणार, कोणते आणि किती स्टेशन या मार्गावर असणार याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ.

Hyperloop Rail: देशातील पहिली हायपरलूप रेल्वे कधी धावणार? जाणून घ्या, नव्या रेल्वेचा मार्ग

या मार्गावरील प्रवासासाठी कमीत कमी १० रुपये ते जास्तीत जास्त ४० रुपयांपर्यंतचे तिकीट दर आकारण्यात येणार आहे. म्हणजेच काय तर बीडहून केवळ ४० रुपयांत अहिल्यानगरला जाता येईल. बीड ते अहिल्यानगर या रेल्वे प्रवासात एकूण १५ रेल्वे स्थानक असणार आहेत. बीड-अहिल्यानगर या १६६ किमी मार्गाचा टप्पा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलाय. तर उर्वरीत बीड-परळी टप्प्यातील काम अजून बाकी आहे.

IRCTC Jyotirlinga Yatra: बम बम भोले! भारतीय रेल्वेची ज्योतिर्लिंग यात्रा, कसं कराल तिकीटाचं बुकिंग, जाणून घ्या यात्रेची संपूर्ण माहिती बीड रेल्वे स्टेशन कुठे आहे?

बीडचे नवे रेल्वे स्टेशन हे बीड बस स्टँडपासून ६ किलोमीटर दूर असलेल्या पालवण गावात आहे. बीड शहरापासून ६ किमी दूर रेल्वे स्टेशन असणार असल्यानं रिक्षावाले प्रवाशांकडून जास्त भाडे घेतील. त्यामुळे पूर्ण प्रवासाला ४० रुपये भाडे असले तरी स्टेशन दूर असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रेल्वेची वेळ काय?

बीड-अहिल्यानगरचा प्रवास रस्त्याने केला तर बायपास रोडने अडीच ते पावणे तीन तास लागतात. या रेल्वेने किमान साडेपाच लागणार आहेत. कारण डेमू रेल्वेचा वेग ३० किमी प्रती तास असणार आहे. या मार्गावर दररोज एक गाडी येणार आहे. गाडी क्रमांक 71441, सकाळी ६.५५ वाजता अहिल्यानगरवरुन निघेल तर ती रेल्वे १२.३० वाजता बीडला पोहोचणार आहे.

तीच गाडी क्रमांक 71442, दुपारी १ वाजता परत अहिल्यानगरसाठी जाईल. सायंकाळी साडेसहा वाजता ही रेल्वे अहिल्यानगरला पोहोचणार आहे. आठवड्यातील सहा दिवस ही रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे १६७ किमीचे अंतर कापणार आहे. त्यामध्ये बीडसह एकूण १५ स्थानकांचा समावेश आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.