खारघर शहर मध्ये सम-विषम पार्किंगसाठी वाहतूक विभागाकडून अधिसूचना जारी
esakal September 18, 2025 01:45 PM

खारघरमधील कोंडीवर तोडगा
सम-विषम पार्किंगसाठी वाहतूक विभागाची अधिसूचना
खारघर, ता. १७ (बातमीदार) : शहरातील मुख्य रस्त्यावर काही भागांत सम-विषम पार्किंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सेक्टर १३, १९ ते २१ मध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मदत होणार आहे.
खारघर वसाहतीमधील वाहतूक कोंडीकडे ‘सकाळ’ने ही वाहतूक विभागाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार खारघरमधील गोखले शाळेकडून शिल्प चौकाकडे जाणारा मुख्य रस्ता, सेक्टर १९ इनटॉप सोसायटी ते पाटील रेसिडेन्सीकडे जाणारा रस्ता, सेक्टर २०मधील केसर गार्डन सोसायटी, शुभहोम सोसायटी ते ट्विन्स टॉवरकडे जाणारा रस्ता आणि सेक्टर २१मधील उन्नती सोसायटी ते नवजीवन हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर खारघर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जमील शेख यांनी सम-विषम पार्किंगसाठी अधिसूचना जारी केली.
-------------------------------
वाहनांचा अडसर
खारघरची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनचालक वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने वाहतूक विभागाला याबाबतचे पत्र दिल्याचे भाजपचे रायगड उत्तर जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.