नाशिक: उझबेकिस्तानमध्ये २० ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या आशिया कर्णबधिर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिकचा बुद्धिबळपटू विवेक वाटपाडे याची अधिकृत निवड झाली आहे. तो शुक्रवारी (ता. १९) भारतातून उझबेकिस्तानकडे रवाना होणार आहे. विवेकने याआधी मैसूर येथे झालेल्या राष्ट्रीय कर्णबधिर बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला होता. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावरच त्याची आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
गत ऑगस्टमध्ये जिल्हा क्रीडा कार्यालयात झालेल्या क्रीडा दिन सोहळ्यात जिल्हाधिकारी व क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला होता. महाराष्ट्र क्रीडा परिषद ऑफ द डेफचे अध्यक्ष राजेश नायर (नागपूर), सचिव गोपाळ बिरारे (नाशिक), महाराष्ट्राचे बुद्धिबळ प्रशिक्षक दर्शन क्षीरसागर (छत्रपती संभाजीनगर) आणि मूकबधिर असोसिएशन (नाशिक) यांच्यातर्फेही त्याचा विशेष गौरव करण्यात आला.
Teacher Transfer: आमच्या मॅडम परत आणा! 'शिक्षिकेची बदली रद्द करण्यासाठी चिमुकल्यांचा आक्रोश'; शाळेत जाणेच केलं बंद..या कार्यक्रमाला संघटनेचे उपाध्यक्ष नितीन थेटे, सरचिटणीस स्वप्नील गोडबोले, सहचिटणीस जयेश लव्हारकर, खजिनदार सुदाम भिसे, सदस्य हिरामण वाघ, राकेश शिंदे, अकीब शेख आणि सदस्या मेघा सोहोनी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विवेकला शुभेच्छा दिल्या. त्याची ही निवड केवळ नाशिकचाच नव्हे, तर महाराष्ट्र व भारतासाठीही अभिमानाची बाब ठरली असून, त्याच्याकडून आशियाई स्तरावर पदकाची मोठी अपेक्षा आहे.